जवळा बाजार शिवारात भर उन्हात पोलिसांचा उसाच्या फडाला वेढा:खून प्रकरणातील आरोपीला अटक, ड्रोनची ही झाली मदत

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-05-03t213033482_1777824070.jpg




औंढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार येथे तरुणाच्या खून प्रकरणात फरार असलेल्या आरोपीला औंढा पोलिसांच्या पथकाने रविवारी ता ३ भर दुपारी उसाच्या फाडाला वेढा देऊन अटक केली. यावेळी पोलिसांनी ड्रोनच्या साह्याने आरोपीचा ठिकाणा देखील काढला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथील मनोहर साखरे (२६) या तरुणाचा खून झाल्याचा प्रकार शनिवारी तारीख दोन पहाटे उघडकीस आला होता. मयत मनोहर यांचा चेहरा दगडाने ठेचलेल्या अवस्थेत होता. याप्रकरणी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात कृष्णा सोनुने या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. मात्र गटारा घडल्यानंतर कृष्ण हा फरार झाला होता. दरम्यान पोलीस अधीक्षक निलाभ रोहन, उपाधीक्षक राजकुमार केंद्रे, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले, पोलीस निरीक्षक जी एस राहिरे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती. या प्रकरणातील फरार आरोपीचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले होते. या प्रकरणातील फरार आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास भगत, उपनिरीक्षक दत्ता कानगुले, गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक माधव जिव्हारे यांचे पथक स्थापन केले होते. या पथकाने कृष्णा याचा शोध सुरू केला होता. दरम्यान आज दुपारी या प्रकरणातील आरोपी कृष्णा हा जवळा बाजार शिवारातील एका शेतातील उसाच्या फडात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलीस निरीक्षक राहिरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भगत, उपनिरीक्षक कानगुले, जिव्हारे जमादार राजेश ठाकूर यांच्यासह पोलिसांच्या पथकाने भर दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास एका शेतात उसाच्या फडाला वेढा दिला. पोलिसांनी उसाच्या फडावर ड्रोनच्या साह्याने पाहणी देखील केली. त्यानंतर आरोपीचा नेमका ठिकाणा कळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून त्यास अटक केली. दरम्यान पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली असता त्याने या खुनाचे कुठलेही कारण नसल्याचे सांगितले. दोन दिवस स्लॅबचे काम केल्यानंतर अठराशे रुपये मिळाले होते. या पैशातून मनोहर सोबत दारू पिली व त्यानंतर हा प्रकार घडल्याचे त्याने पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत सांगितले आहे. दोन दिवसापासून पोलिसांना हुलकावणी देणारा कृष्णा अखेर पोलिसांच्या तावडीत सापडल्यानंतर पोलिसांनी ही सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed