बुद्ध पौर्णिमेला 58 पर्यटकांना मिळणार “निसर्ग अनुभवाची’ संधी:कृत्रिम, नैसर्गिक पाणवठ्यावर प्राणी गणनेकरिता मचाणी तयार

0
240_177756251169f3738f0ecf5_30graminakot.jpg



बुद्ध पौर्णिमेला ५८ पर्यटकांना निसर्ग अनुभवाची संधी मिळणार असून, प्राणी गणनेसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. सुमारे ८१ हजार हेक्टरवर पसरलेल्या अकोट वन्य जीव विभागात १ मे रोजी बौद्ध पौर्णिमेला मचाणावर बसून टिपूर चांदण्यात निसर्ग अनुभव घेण्याची सुवर्ण संधी

.

दर वर्षी बौद्ध पौर्णिमेला मचाणावर बसून प्राणी गणना करण्यात येते त्यासाठी पाणवठ्याजवळ पुरेशा उंचीवर मचाण बांधण्यात येते. या मचाणावर वन्य जीव विभागाचे कर्मचाऱ्यांसोबत हौशी निसर्गप्रेमींना बसण्याची संधी मिळते. पौर्णिमेला टिपूर चांदण्यात तहान भागवण्यासाठी वन्य प्राणी पाणवठ्यावर येतात त्यावेळी त्यांची नोंद करून प्रत्यक्ष प्राणी गणना केली जाते. अकोट वन्यजीव विभागात पट्टेदार वाघासह बिबटे राहत असल्याने वन्यप्रेमींना त्यांचे दर्शन झाल्याचा दरवर्षीचा इतिहास आहे. इतर पर्यटकांना अस्वल, रानगवे, हरणाच्या विविध प्रजाती, सांबर, मोर, लंगूर, नीलगाय, गवा, बिबट, अस्वल, रातवा, विविध माकडे, कोल्हे, ससे यांचे हमखास दर्शन होते. निसर्गाच्या सानिध्यात सुमारे ८ ते ९ तास निःशब्द राहुन जंगलातील विविध आवाज ऐकत पाणवठ्यावर आलेले प्राणी पाहण्याची सुवर्ण संधी दर वर्षी फक्त वैशाख महिन्याच्या पोर्णिमेला वन्य प्रेमींना मिळणार आहे.

निसर्ग अनुभवासाठी अकोट वन्यजीव विभाग सज्ज झाला असून नरनाळा, सोमठाणा, सोनाळा, धारगड,वान या वनक्षेत्रात बौद्ध पौर्णिमेच्या लखलखत्या प्रकाशात निसर्ग सौंदर्यासोबतच विविध प्राणी पाहण्याची संधी आणि रात्रीचा थरारक अनुभव घेता येणार आहे.

रात्रभर होणार प्राणीगना या प्राणी गणनेत सहभागी होण्याची संधी ५८ वन्यप्रेमींना मिळाली असून. १ मे रोजी हे पर्यटक वन्य जीव विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत पाणवठ्यावर जातील तेथे रात्रभर थांबून २ मे रोजी परत येतील यासाठी एकूण ३५०० रुपये (प्रतिव्यक्ती)शुल्क आकारण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed