देवेंद्र फडणवीसांनी एकदा तरी सीमा बांधवांचा उल्लेख केला का?:बेळगाव प्रश्नावरून संजय राऊतांचा सवाल, हुतात्मा स्मारकाला तडे गेलेत, सत्ताधाऱ्यांनी तिथे लक्ष द्यावं
![]()
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकदा तरी सीमा बांधवांचास एकदा तरी उल्लेख केला आहे का? किंवा भाजपच्या मंत्र्यांनी इतक्या वर्षांमध्ये बेळगाव शिवाय महाराष्ट्र अपूर्ण आहे, याचा उल्लेख तरी केला आहे का? असा सवाल उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. बेळगावमध्ये मराठी माणसांवर होणारे अत्याचार आणि मराठी दडपण्याचे जे प्रयत्न होत आहेत त्या संदर्भात भाजपचे लोकं बोलले का? हा खटला 17 वर्षांपासून न्यायप्रविष्ठ आहेत, त्यावर वकीलांशी चर्चा केली आहे का? असा सवाल राऊतांनी केला आहे. संजय राऊत म्हणाले की, ज्या लोकांचा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याशी काहीही संबंध नाही असे लोकं आज सत्तेवर बसले आहेत. जे शिवसेना म्हणून सत्तेत आहेत त्यांचे हे कर्तव्य नाही का? शंभुराज देसाई, चंद्रकांत पाटील यांनी कधी बेळगावमधील लोकांच्या भावना समजून घेतल्या का? एकनाथ शिंदेंनी बेळगावात त्यांनी पाऊल ठेवले का? यांना महाराष्ट्राची काळजी आहे. भाजपला महाराष्ट्रात आम्ही स्कोप दिला संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पक्षाला महाराष्ट्रात आम्ही स्कोप दिला आहे. महाराष्ट्रात आम्हाला स्कोप द्यायचा का नाही हे जनता ठरवेल. तुमचे पैसे, पोलिस किंवा EVM ठरवणार नाही. काँग्रेसने जी नाराजी व्यक्त केली त्यावर आम्ही चर्चा केली. त्यामुळे विधान परिषदेसाठी काँग्रेसने उमेदवार दिला नाही. अंबादास दानवे हेच मविआचे उमेदवार आहेत. दोन वर्षांनी काय करायचे त्याचा विचार तेव्हा करू. राज्यसभेचा प्रश्नच निर्माण होत नाही. भविष्यात विधान परिषदेसंदर्भात काँग्रेसची चर्चा झालेली आहे. ..राज ठाकरे-उद्धव ठाकरेंची भूमिका एकच संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात पाहुणे म्हणून येत असाल तर आमची भाषा शिकण्याचा प्रश्न नाही. पण जर तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल इथेच राहतात त्यांनी मराठी शिकावी ही आमची इच्छा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठीचे नाव काढल्यावर मिर्च्या का झोबतात? असा सवाल राऊत यांनी केला आहे. मराठी सक्तीच्या गर्जनेचे काय झाले. राज ठाकरेंनी घेतलेली भूमिका अगदी योग्य आहे. तीच भूमिका उद्धव ठाकरेंची आहे आणि बाळासाहेब ठाकरेंची होती. महाराष्ट्रात शिकणाऱ्या माणसाला मराठी शिकणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांनी भाषावर प्रांत रचना का केली याचा अभ्यास केला पाहिजे. हुतात्मा स्मारक चांगल्या पद्धतीने राहू द्या संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्र लढ्याच्या ज्या ज्या स्मृती आम्ही निर्माण केल्या आहेत, मग संयुक्त महाराष्ट्र दालन असो की हुतात्मा स्मारक असो. या गोष्टी जतन करण्याचे काम होते. पण गेल्या 4 वर्षांमध्ये मुंबई मनपामध्ये प्रशासन राज्य भाजपने आणलेत्यामुळे या वास्तु धुळ खात पडल्या होत्या. याला जबाबदार मुंबईमधील त्याकाळचे प्रशासक होते. हुतात्मा स्मारक चांगल्या पद्धतीने राहू द्या ही मागणी आमचे नेते मनपा आयुक्ताकडे करणार आहे लढाईची तयारी करावी लागेल संजय राऊत म्हणाले की, मुंबईवर मराठी माणसांचेच वर्चस्व राहीले पाहिजे. महाराष्ट्रात मराठी माणसाचाच आवाज बुलंद राहीला पाहिजे. महाराष्ट्र कधीही दिल्लीचा गुलाम होऊ नये यासाठी तो लढा झाला. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्यासाठी तेव्हा व्यापारी, धनिक, राज्यकर्ते यांनी जे षड्यंत्र रचले होते त्याविरोधात मराठी कामगारांनी बंड केले. त्यामध्ये अनेक लोकांनी महाराष्ट्र पेटवत ही लढाई केली अन् मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला. महाराष्ट्र टिकवणे आता मोठे आव्हान आहे. सरकार आज पुन्हा मुंबई भांडवलदारांच्या धशात घालताना दिसत आहे. त्यामुळे पुढच्या लढाईसाठी आम्हाला मानसिक तयारी करावी लागेल. हुतात्मा स्मारकाला तडे गेले संजय राऊत म्हणाले की, आज जागतिक कामगार दिन आहे. मुंबई ही परंपरेने कामगार आणि कष्टकऱ्यांची आहे. मुंबईतील गिरणी कामगार संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात उतरले त्यामध्ये अनेक कामगारांनी बलिदान दिले. कामगारांना आंदराजली म्हणून 1 मे महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतात. महाराष्ट्र निर्माण होऊन आज 67 वर्षे झाली आणि तो अखंड आहे. हुतात्मा स्मारकाला काल आम्ही रात्री जाऊन अभिवादन केले. त्या ठिकाणी मला एक विदारक चित्र दिसले त्या स्मारकाला तडे गेले आहेत. सत्ताधाऱ्यांनी त्या स्मारकाची पाहणी करत त्यांचे काम करावे.
