‘जीएमसी’त आता खऱ्या अर्थाने‘स्मार्ट’स्वच्छता; दोन वेळा सफाई:कंपनीच्या विरोधात तक्रारी तीन शिफ्टमध्ये होतेय रुग्णालयाची मशीनद्वारे स्वच्छता
![]()
प्रतिनिधी | अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयातील स्वच्छतेसाठी नियुक्त स्मार्ट कंपनीमार्फत दिवसांतून तीन शिफ्टमध्ये स्वच्छतेचे काम केले जात असल्याने रुग्णालयाची स्वच्छता केली जात आहे. संपूर्ण रुग्णालयाची मशीनद्वारे स्वच्छता कंत्राटी कर्मचारी आता करत असल्याने रुग्णालयाचे आवार वॉर्डाच्या समोरील पॅसेज, सर्विस गल्लीत साचलेले कचऱ्याचे ढीगही उचलण्यात आले आहेत. रुग्णालयात वॉर्डामध्ये प्रवेश करताच येणारी दुर्गंधी आता दूर झाली आहे. परिणामी रुग्णालयातील स्वच्छता आता खऱ्या अर्थाने ‘स्मार्ट’ झाली आहे. यापूर्वी स्मार्ट कंपनीच्या विरोधात अनेक तक्रारी अधिष्ठाता कार्यालयात सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांकडून ऑनलाइन प्रणालीद्वारे करण्यात आल्या होत्या. त्याची दखल घेत स्वच्छतेवर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे, अशी माहिती अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय सोनुने यांनी दिली. स्मार्ट कंपनी ही कोल्हापूर येथील असून, ती शासनाकडून आली आहे. ‘स्मार्ट’चे कंपनी रुग्णालयात स्वच्छतेचे काम प्रामाणिकपणे करत आहेत. रुग्णालयात वॉर्डामध्ये प्रवेश करताच येणारी दुर्गंधी आता दूर झाली आहे. परिणामी रुग्णालयातील स्वच्छता आता खऱ्या अर्थाने ‘स्मार्ट’ झाली आहे. या कर्मचाऱ्यांनी दररोज स्वच्छता केल्याचे फोटो त्यांच्या स्वच्छता निरीक्षकांमार्फत येत आहेत. रुग्णालयात वावरणारे काहीजण असंतुष्ट व्यक्तींना हाताशी धरून या कंपनीचे कंत्राट रद्द करुन तेथे आपली माणसे लावण्यासाठी हा खटाटोप करत आहेत. रुग्णालयात स्वच्छता असताना कुठलेही अडगळीतील फोटो समाज माध्यमावर व्हायरल करुन शासनाची दिशाभूल करत आहेत, असेही डॉ. सोनुने यांनी सांगितले. अत्याधुनिक यंत्रणेचा स्वच्छतेसाठी होतोय वापर अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अकोला येथे वेट-ड्राय मोप, हाय-प्रेशर जेट, व्हॅक्युम व सिंगल-डिस्क मशीनच्या मदतीने वॉर्डाची आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने स्वच्छता नियमित केली जात आहे. या अत्याधुनिक यंत्रणेमुळे रुग्णालयातील स्वच्छता अधिक प्रभावी व सुरक्षित पद्धतीने राखली जात आहे. – तुषार सोनोने , मॅनेजर, स्मार्ट सर्व्हिसेस, अकोला
