Bacchu Kadu | बच्चू कडूंचं ठरलं; अखेर शिंदेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश

0
sayali-web-2026-04-30T121634.881.webp.webp


Bacchu Kadu | राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी अखेर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.

बच्चू कडूंचं स्पष्टीकरण

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हा निर्णय सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, मजूर आणि दिव्यांगांच्या हक्कांसाठी घेतल्याचे स्पष्ट केले. “एकनाथ शिंदे हे सेवाभावी नेतृत्व असून सर्वसामान्यांसाठी त्यांचे दरवाजे नेहमी खुले असतात. त्यामुळेच मी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.”

बच्चू कडू यांनी केवळ राजकीय तडजोड म्हणून नाही, तर खालील अटी आणि मुद्द्यांवर सहमती झाल्यानंतर हा निर्णय घेतल्याचा दावा केला आहे. शेतीमालाच्या हमीभावाच्या कायद्यात ठोस सुधारणा करणे. एकनाथ शिंदे यांनी स्थापन केलेल्या देशातील पहिल्या स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाला अधिक अधिकार आणि निधी मिळवून देणे.’लाडकी बहीण’ योजनेचा लाभ अजूनही ज्या विधवा भगिनींना मिळालेला नाही, त्यांना प्राधान्य देणे.

‘प्रहार’चे भवितव्य काय?

राजकीयदृष्ट्या बच्चू कडू आता शिवसेनेचा भाग असले तरी, त्यांच्या सामाजिक चळवळी थांबणार नाहीत. प्रहार सामाजिक संघटना आणि प्रहार दिव्यांग संघटना या पूर्वीप्रमाणेच स्वतंत्रपणे कार्यरत राहतील. शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी ते राज्यभर दौरा करणार असले तरी, “माझ्या रक्ताचा प्रत्येक थेंब जितका पक्षासाठी धावेल, तितकाच तो शेतकरी आणि मजुरांसाठीही धावेल,” असे त्यांनी निक्षून सांगितले.

बच्चू कडू यांनी त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात शिवसेनेतूनच केली होती. त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत सांगितले की, “शेतकरी कर्जमाफी आणि कापसाच्या भावासाठी आम्ही तेव्हा बाळासाहेब ठाकरेंना पत्र देऊन बाहेर पडलो होतो. आज पुन्हा त्याच शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आम्ही धनुष्यबाण हाती घेत आहोत.”

News Title: Bacchu Kadu Joins Shiv Sena Official Announcement 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed