केवळ अभ्यासावरच भर न देता खेळांमधून विकासावर भर द्यावा:पार्थसारथी शुल्क

0
240_177745566969f1d23589000_29batu.jpg




प्रतिनिधी | अकोला दरवर्षीप्रमाणे यंदाही स्व. डॉ. बाबासाहेब उटांगळे संस्थापित सर्व शाखीय महाराष्ट्रीय ब्राह्मण संघाचा व्रतबंध सोहळा आयोजित करण्यात आला. जानोरकर मंगल कार्यालयात आयोजित या सोहळ्यात ९ बटुंवर उपनयन संस्कार करण्यात आले. अध्यक्षस्थानी पार्थसारथी शुक्ल होते. त्यांनी बटूंना मार्गदर्शन केले. केवळ अभ्यासावरच भर न देता खेळ व क्रीडामार्फत सर्वांगीण विकास कसा होईल, यावर भर द्यावा असा सल्ला त्यांनी दिला. गत वीस वर्षांपासून या संस्थेमार्फत रश्मी जोशी यांनी सुरू केलेला उपनयन संस्काराचा उपक्रम दरवर्षी साजरा केला जातो. हा उपक्रम गरजू बटुंकडून नाममात्र वर्गणी घेऊन करण्यात येतो. प्रशांत जोशी व विजय तिवारी यांनी संघाचे या कामाबाबत कौतुक करून दरवर्षी वेगवेगळे कार्यक्रम करावे असे मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात उदय महा, अतुल पाटील, राजेंद्र टाकळकर, संजय देशमुख, राधेश्याम तिवारी, मोहन पांडे, सुभाष देशपांडे, अर्चना शर्मा, सीमा डुबे, कीर्ती मिश्रा, मंजूषा घोटीकर, नगरसेवक नीलेश देव, प्रशांत जोशी, चंदा शर्मा उपस्थित होते. प्रास्ताविक अंजली जोशी यांनी केले. सूत्रसंचालन ज्योती नंद व डॉ. सतीश उटांगळे यांनी केले. आभार डॉ. सुहास काटे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संघाच्या अध्यक्षा अंजली जोशी, कार्याध्यक्ष श्यामराव कुळकर्णी, सचिव ज्योती नंद, उपाध्यक्ष दीप्ती धर्माधिकारी, कोषाध्यक्ष प्रशांत काळे, मार्गदर्शक डॉ. सतीश उटांगळे, सविता काळे, जयश्री गुळाखे, शोभा ठकार आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed