विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागात विद्यार्थ्यांचा निरोप:सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपल्या ध्येयाकडे वाटचाल करावी

0
240_177745866069f1dde4b2cc3_chemistrdept.jpg




प्रतिनिधी | अमरावती संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागात केमिकल क्लबचा समारोप व भाग-२ च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्य.प. सदस्य डॉ. संदीप वाघुळे, प्रमुख अतिथी म्हणून अप्लाईड इलेक्ट्रॉनिक्स विभागप्रमुख डॉ. सुजाता काळे, अधिसभा सदस्य डॉ. जागृती बारब्दे, डॉ. जयंत वडतकर, केमिकल क्लब समन्वयक डॉ. मनिषा कोडापे, प्रा.ए.एस. वानखडे, प्रा. आर.डी. सातपुते उपस्थित होते. डॉ. सुजाता काळे मार्गदर्शन करतांना म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण मेहनत व सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपल्या ध्येयाकडे वाटचाल करावी. तर अध्यक्षीय भाषणातून डॉ. संदीप वाघुळे यांनी परीक्षा, संशोधन, उद्योग क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्रातील स्पर्धांची माहिती देत विद्यार्थ्यांनी वेळेचे योग्य व्यवस्थापन, शिस्त, प्रामाणिकपणा आणि चिकाटीच्या जोरावर यश संपादन करीत आपल्या विद्यापीठाचा नावलौकिक करावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या निमित्ताने रांगोळी स्पर्धा, कविता, शायरी, सजावट, क्रिकेट अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले, त्यामध्ये विद्यार्थ्यांनी हिरीरिने भाग घेतला. स्पर्धेत विजेता ठरलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व स्मृतिचिन्ह देवून मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. तसेच राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर विभा गाचे नांव उज्ज्वल करणाऱ्या विद्यार्थांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकातून डॉ. मनिषा कोडापे यांनी कार्यक्रमाविषयी माहिती दिली. सूत्रसंचालन रेणुका काळे, तर आभार कोमल भालतडक हिने मानले. कार्यक्रमाला सर्व प्राध्यापकवृंद, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता श्रीराम सातव, कल्पना बैस, नरेंद्र व्यवहारे आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed