गोशाळेच्या आगीत चारा व गुरांचे साहित्य जळून खाक:गुरे बाहेर चरत असल्याने जीवितहानी टळली
![]()
प्रतिनिधी | सोयगाव आमखेडा येथील क्रांती जनहित बहुउद्देशीय विकास संस्था संचालित अंजनाई गोशाळेत मंगळवारी (दी.२८) दुपारी अचानक लागलेल्या आगीत सुमारे ३० क्विंटल चारा व गुरांचे साहित्य जळून खाक झाले. या घटनेत सुमारे सव्वा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सुदैवाने आग लागली तेव्हा गुरे बाहेर चरत असल्याने जीवितहानी टळली. दुपारी तीनच्या सुमारास गोशाळेतील चाऱ्याला अचानक आग लागली. काही वेळातच आगीने विक्राळ रूप धारण केल्याने परिसरात एकच धावपळ उडाली. आग आटोक्यात आणण्यासाठी ग्रामस्थांनी तातडीने धाव घेतली. ज्ञानेश्वर गाडेकर, अनिल लोखंडे, रामेश्वर बोडखे, एकनाथ ठोंबरे, पवन आगे, ज्ञानेश्वर जाधव, आदींनी प्रयत्न केले.
