स्केटिंग स्पर्धेत चिमुकल्या‎खेळाडूंनी गाजवले मैदान‎:स्पर्धेत नगर जिल्ह्यासह परजिल्ह्यातील खेळाडूंचा डंका‎

0
253_177746004769f1e34f60896_66515156775.jpg




प्रतिनिधी | अहिल्यानगर
जिल्ह्यातील आधुनिक २०० मीटर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सिंथेटिक स्केटिंग रिंकवर प्रथमच आयोजित करण्यात आलेली राजस्व स्पीड स्केटिंग स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेचे आयोजन राजस्व स्पोर्ट्स क्लबचे संस्थापक चेतन शहाणे यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते. स्पर्धेचे नियोजन स्केटिंगपटू प्रशांत पाटोळे यांनी केले. स्पर्धेमध्ये विविध वयोगटांतील खेळाडूंनी चांगली कामगिरी करत प्रेक्षकांची मने जिंकली. मुलांच्या गटात सोहम शिंदे, कार्तिक नन्नावरे, जय भंडारी, विआन मुथा आणि विआन पितळे यांनी चांगले प्रदर्शन केले. यामध्ये सोहम शिंदे याने सुवर्णपदक पटकावले. मुलींच्या गटात ईश्वरी आव्हाड, श्रीनिधी गायकवाड, सई नागरे, सिद्धी घोडेस्वर आणि राजनंदिनी कांडेकर यांनी चांगले प्रदर्शन करत सुवर्णपदकांची कमाई केली. या स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्यासह सोलापूर, जालना, शिरूर, श्रीरामपूर तसेच विविध तालुक्यांतील नामांकित शाळा व स्केटिंग अकॅडमींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्पर्धा ४, ६, ८, १०, १२ वर्षे व खुला गट तसेच क्वॉड, रिक्रिएशन, इनलाईन आणि बिगिनर अशा विविध प्रकारांमध्ये घेण्यात आल्याचे प्रविण गायकवाड यांनी सांगितले. स्पर्धेसाठी कर्नल अशोक कुमार, उद्योजक सागर कायगावकर, योगेश शहाणे, विशाल बोऱ्हाडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed