युगल स्वरांजलीत भरला सुरांचा सुवर्ण सोहळा:गरजू कलावंतांसाठी आधाराचा हात : सुरेल युगल गीतांचे कलाकारांनी केले दमदार सादरीकरण‎

0
240_177736360569f06a9536833_swaranjali.jpg




प्रतिनिधी | अमरावती येथील सा इंटरनॅशनल म्युझिक अकादमीच्यावतीने आयोजित ‘युगल स्वरांजली’ हा जुन्या हिंदी चित्रपटसंगीताला वाहिलेला आगळावेगळा कार्यक्रम घेण्यात आला. सिपना कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या प्रशस्त सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात एकाहून एक सरस गीते सादर करण्यात आली. सुरेल युगल गीतांचा वर्षाव झाला. कलाकारांचे दमदार सादरीकरण झाले. भावपूर्ण वातावरणामुळे संपूर्ण सभागृह संगीताच्या माधुर्यात न्हाऊन निघाले. हेच या कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे विविध गायक, गायिकांनी सादर केलेली अजरामर जुनी हिंदी युगल गीते. प्रत्येक कलाकाराने आपल्या खास शैलीत गाणी सादर केली. प्रेक्षकांना सुवर्णकाळातील संगीतसफरीवर नेले. विशेष म्हणजे प्राध्यापक डॉ. स्नेहाशीष दास यांनी प्रत्येक कलाकारासोबत स्वरमिलन केले. त्यामुळे कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त झाली. कार्यक्रमात सादर झालेल्या गीतांमध्ये ‘जो वादा किया वो निभाना पडेगा’ – सविता पडोळे, जाग दर्द-ए-इश्क़ जाग- डॉ. जयश्री नांदूरकर, करवटें बदलते रहें सारी रात हम- प्रा. विद्या व्यास, बने चाहे दुश्मन ज़माना हमारा- मिलिंद जोशी, दिल की नजर से नजरों की दिल से- मंजिरी चेपे-शास्त्री, आहा रिमझिम के ये प्यारे प्यारे गीत लिए- छाया अग्रवाल, दिल है कि मानता नहीं- वैदेही खेडकर, ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे- आयुष तिवारी, छुपा लो यूँ दिल में प्यार मेरा-स्मिता पाटील, छोड़ दो आँचल ज़माना क्या कहेगा- राधा बनकर, दिल तड़प तड़प के कह रहा है- रजनी भवाळकर, मेघा रे मेघा रे मत परदेस जा रे- अमृता वाठोडकर, इशारों इशारों में दिल लेने वाले- जान्हवी बल्लाळ, यम्मा यम्मा ये खूबसूरत समां- मिलिंद जोशी, कुहू कुहू बोले कोयलिया- निकिता मोने, अभी ना जाओ छोड़ कर- प्रवरा राणे कुलकर्णी, आजा सनम मधुर चांदनी में हम- प्रतिभा कुलकर्णी यांचा समावेश होता. अभिजीत भावे (गिटार), शुभम फुसे (सिंथेसायझर), कृष्णा सावरकर (हार्मोनियम), अभिषेक लोखंडे (तबला), कुलदीप चावरे (ढोलक) आणि सतीश मंडले (ऑक्टोपॅड) यांनी दिलेल्या सुरेल साथीमुळे प्रत्येक गीत खुलून आले. कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ संगीततज्ज्ञ कमलताई भोंडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर प्रा. विद्या व्यास यांनी कार्यक्रमामागील प्रेरणा आणि उद्दिष्टे स्पष्ट करणारे मनोगत व्यक्त केले. संपूर्ण कार्यक्रमाचे प्रभावी, ओघवते, रंगतदार सूत्रसंचालन संदीप सावरकर यांनी केले. शेवटी मंजिरी चेपे-शास्त्री यांनी उपस्थित मान्यवर, कलाकार, रसिकांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सिपना कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे डॉ. मळसणे व घाटे यांच्यासह अकॅडमीच्या संचालिका सौम्या दास, दीपक चौधरी, सविता पडोळे, मानस दास, अकॅडमीच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. नव कलावंतांचा सन्मान, सोहळ्याचे अर्थार्जनही केवळ मनोरंजन नव्हे. सामाजिक बांधिलकीचा सुंदर संदेशही या कार्यक्रमातून देण्यात आला. आर्थिकदृष्ट्या दुर्बल, उपेक्षित, गरजू कलावंतांना सन्मानपूर्वक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. त्यांच्या कलेला नवसंजीवनी देणे हा उद्देश होता. त्यांना आर्थिक मदत देणे हा उद्देश होता. सामाजिक गौरव प्रदान करणे हा उद्देश होता. त्यामुळे संगीताच्या माध्यमातून समाजकारणाची जाणीव जागवणारा हा उपक्रम सर्वांच्याच कौतुकाचा विषय ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed