युवक मृत्यूप्रकरणी ‘एलसीबी’कडून चौकशी:पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांनी घटनास्थळी जाऊन चौकशीचे आदेश दिले

0
transfar_240_177738580169f0c1492f124_pathak.jpg




प्रतिनिधी | अकोला जुने शहर शिवाजी नगर परिसरातील चेतन बबन शेळके (२८) यांचा भाजल्याने मृत्यू झाल्याप्रकरणी डाबकी रोड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. परंतु याप्रकरणी वस्तुस्थितीशी विसंगत माहिती प्रसारित झाल्याचे निदर्शनास आल्याने पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांनी घटनास्थळी जाऊन चौकशीचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेकडे दिले होते. त्यानुसार मंगळवारी गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षकांनी पथकासह घटनास्थळी जाऊन मृताचे नातेवाइक व प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांकडे चौकशी केली. चौकशीदरम्यान रिधोरा रोडवरील पेट्रोल पंपाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानुसार मृत चेतन शेळके हा रविवारी (दि.२६) सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या एक्स्प्रेस गाडी क्रमांक एमएच २७ सीडी ५८९९ ने पेट्रोल पंपावर येऊन बॉटलमध्ये पेट्रोल खरेदी करत यूपीआयद्वारे देत असल्याचे स्पष्ट झाले. त्याच दिवशी रात्री ९.३० च्या सुमारास मृताचे शरीर जळताना दृष्टीस पडले. घटनेची माहिती पोलिस पाटलांनी ११२ डायलवर ९ वाजून ५३ मिनिटांनी दिली. यानंतर जुने शहर व डाबकी रोड येथील पोलिस पथके घटनास्थळी पोहोचले. मृताचे वडील त्यावेळी तेथे उपस्थित होते व त्यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याला रुग्णालयात दाखल केल्याचे निष्पन्न झाले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून प्राप्त अॅडव्हान्स पीएम रिपोर्टमधून भाजल्याने झालेल्या आघातातून मृत्यू झाल्याचे नमूद आहे. उर्वरित पान ४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed