गायीचे संगोपन करणे प्रत्येकाची जबाबदारी:बी. चंद्रकांत रेड्डी
![]()
प्रतिनिधी | अकोला उमरीतील टिळक राष्ट्रीय सरस्वती मंदिर शाळेतील गोरक्षणमध्ये गोमाता सन्मान दिवसाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रम टिळक राष्ट्रीय सरस्वती मंदिर शाळा माजी विद्यार्थी संघाच्या वतीने पार पडला. यानिमित्ताने रॅलीही काढण्यात आली. गाय ही कामधेनू आहे. गाय वाचवणे व गाईचे संगोपन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे अप्पर पोलिस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी म्हणाले. माजी विद्यार्थी संघाच्यावतीने गोरक्षण उपयोगी साहित्याचे वाटप प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गाय वाचवा, देश वाचवा हा संदेश रथावर लावण्यात आला होता. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. त्यानंतर प्रचार रथाची गावातून फेरी मारण्यात आली. अध्यक्षस्थानी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष दिगंबर वनारे होते. प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक संध्या भटकर, उमेश मसने, बानुवाकोडे महाराज, प्रकाश मालगण, सुनील भातुलकर, अरुण धनभर, रवी वानखडे, शरद इंगोले आदी उपस्थित होते.
