गोमातेच्या सन्मानार्थ पदयात्रा; संरक्षण करण्याचीही मागणी:पालखीत ठेवून नेलेले निवेदन दिले तहसीलदार सुनील चव्हाण यांना‎

0
240_177735976769f05b97c8ac5_1004498511.jpg




प्रतिनिधी | अकोट गोमातेला राष्ट्रमाता घोषित करून तिचे व गोवंशाचे संरक्षण आणि संगोपन करण्यासाठी कठोर कायदे, करा अशी मागणी करत सोमवारी गोभक्तांनी निवेदनाद्वारे केली आहे. त्यासाठी गावातून पदयात्रा काढण्यात आली. सकल हिंदू समाजाच्या वतीने श्री नरसिंग महाराज मंदिर येथून गोमातेच्या सन्मानार्थ पदयात्रेला प्रांरभ झाला. या पदयात्रेत पालखीत गोवंश प्रेमींच्या सह्यांचे निवेदन ठेवण्यात आले होते. तसेच गोमाता सुद्धा पदयात्रेत सहभागी करण्यात आले होते. रितसर पूजाअर्चा करून पदयात्रेला प्रांरभ झाला. या पदयात्रेत सहभागी झालेले सर्व गोभक्त, गोप्रेमी, विश्व हिंद परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, राजकीय पक्षाचे नेते, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते समस्त नागरिक, व्यापारी सहभागी झाले होते. यात महिलांचाही सहभाग होता, शहरी तसेच ग्रामीण भागातून गो-भक्त उपस्थित होते. पदयात्रेत सहभागी नागरिकांनी गोमातेच्या संरक्षणासाठी जोरदार घोषणा देत जनजागृती केली. शहरातील विविध मार्गांवरून निघालेल्या या यात्रेचा समारोप तहसील कार्यालय, अकोट येथे करण्यात आला. यावेळी तहसीलदार, अकोट यांना पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल तसेच राज्याचे मुख्यमंत्री यांच्या नावे गोमातेच्या संरक्षण व सन्मान संदर्भातील मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. अकोट शहरात गोमातेच्या सन्मानार्थ आयोजित पदयात्रेत नागरिकांनी सहभाग घेतला. राष्ट्रमातेचा सन्मान देण्याचेही घालण्यात आले साकडे निवेदनावर अंदाजे १० ते १५ हजार सह्यांचे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात गोमातेला राष्ट्रमातेचा सन्मान घोषित करण्यात यावा, गोमातेची कत्तल थांबवावी व कत्तल करणाऱ्यांवर कठोरतेने कारवाई हवी अशा अनेक मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी व तहसीलदार सुनील चव्हाण यांना देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed