आदर्श हायस्कूल येथे रौप्य महोत्सवी कला, क्रीडा,व्यक्तिमत्व विकास शिबिराचे उद्घाटन:विद्यार्थी दशेमध्ये मैदानी खेळ खेळणे सर्वात महत्वाचे :संस्था उपाध्यक्ष के.जे.मेतकर‎

0
240_177720123769edf0557c137_adarshakrida.jpg




प्रतिनिधी । दर्यापूर विद्यार्थीं दशेत अभ्यासाबरोबर निरोगी व तंदुरस्त आयुष्य जगण्यासाठी मैदानी खेळ खेळणे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन श्री.शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष केशव मेतकर यांनी केले. शहरातील आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे मागील २५ वर्षांपासून ग्रीष्मकालीन कला क्रीडा व व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. सदर रौप्य महोत्सवी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मेतकर बोलत होते.यावेळी उद्घाटक म्हणून नगराध्यक्ष मंदाकिनी भारसाकळे, प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हा को-ऑपरेटिव्ह बँकचे माजी अध्यक्ष सुधाकर भारसाकळे, पंचायत समिती शिक्षण विस्तार अधिकारी नंदकुमार जाधव,शाळा समिती सदस्य पंजाब म्हाला, भागवत बुरघाटे, भिकमचंद्र सोमानी, ज्ञानदेव घाटे, दिनकर गायगोले, अण्णासाहेब रेचे, अॅड. श्रीरंग अरबट, शिवाजी देशमुख,नरेशचंद्र लढ्ढा,रामकृष्ण तराळ,शेषराव काळे, भारती काळे,शाळा निरीक्षक विनायक गावंडे, मुख्याध्यापक मनोज देशमुख मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या विद्यार्थ्यांनी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या गौरव गीताने केली. त्यांना योगिनी इंगळे व उमा बुंदेले व त्यांच्या सहकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. मेतकर यांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर व डॉ.भाऊसाहेब देशमुख यांच्या जीवनावर आधारित दाखले देत सविस्तर मार्गदर्शन केले. प्रास्ताविकातून मुख्याध्यापक मनोज देशमुख यांनी शिबिर व शाळेत राबवण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक योजनांविषयी माहिती दिली. प्रमुख अतिथी सुधाकर भारसाकळे व नंदकुमार जाधव यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या उद्घाटिका मंदाकिनी भारसाकळे यांनी २५ वर्षापासून सुरू असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्यात. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडाशिक्षक सचिन खांडे तर आभार प्रदर्शन शिक्षक प्रतिनिधी अनिल भारसाकळे यांनी केले. कार्यक्रमाला उपमुख्याध्यापक शैलेश ठाकरे, शिक्षकेतर कर्मचारी प्रतिनिधी प्रदीप भारसाकळे, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्येने शिबिरात सहभागी विद्यार्थी त्यांचे पालक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed