संघरत्न सरोदे अमरावती जिल्हा परिषदचे नवे शिक्षणाधिकारी:सतीश मुगल यांच्याकडून स्वीकारला पदभार, नांदेडहून बदली
![]()
अमरावती जिल्हा परिषदेचे नवे शिक्षणाधिकारी म्हणून संघरत्न सरोदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी बुधवारी अमरावतीत पदभार स्वीकारला. सरोदे यांनी प्रभारी शिक्षणाधिकारी सतीश मुगल यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारली. सरोदे यांच्या पदभार स्वीकारल्यामुळे मुगल हे आता उपशिक्षणाधिकारी या त्यांच्या मूळ पदावर कायम राहतील. यावेळी जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा शिक्षण विभागाचे अधीक्षक पंकज गुल्हाने यांच्या नेतृत्वात शिक्षण विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सरोदे यांचे स्वागत केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरोदे यापूर्वी नांदेड येथे याच पदावर कार्यरत होते. शासनाने त्यांची अमरावती येथील रिक्त पदावर बदली केली आहे.
