त्र्यंबकेश्वर व्हीआयपी दर्शन घोटाळा:विश्वस्ताच्या खासगी बचत खात्यात 1.13 कोटी जमा, विश्वस्त पुरुषोत्तम कडलग, गोटीराम बेहरे यांना तीन दिवसांची कोठडी

0
orig_new-project-2026-04-21t070740424_1776735432.jpg




त्र्यंबकेश्वर मंदिर व्हीआयपी दर्शन घोटाळ्यात नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. मुख्य संशयित विश्वस्त पुरुषोत्तम कडलग याच्या खासगी बँकेतील बचत खात्यात तब्बल १ कोटी १३ लाखांची रक्कम जमा असल्याचे एसआयटीच्या तपासात निष्पन्न झाले. अवघ्या चार दिवसांत ७१ भाविकांना चोरवाटेने दर्शन घडवल्याचा ठपकाही विश्वस्तावर ठेवण्यात आला. या प्रकरणाचा सखोल तपास करण्याकरिता कडलग आणि बेहरे या दोन्ही संशयितांच्या पोलिस कोठडीत २४ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली. आधीच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे दोघांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. पैशांचा मार्ग शोधणे आवश्यक असल्याचे न्यायालयाचे निरीक्षण न्यायाधीश एस. व्ही. लाड यांनी तपासात समोर आलेले आर्थिक व्यवहार आणि रजिस्टरमधील नोंदी यांचा थेट संबंध जोडणे गरजेचे असल्याचे नमूद केले. हा पैसा नक्की कुठून आला आणि कुणाकडे गेला याचा तपास करण्यासाठी कोठडी गरजेची असल्याचा युक्तिवाद मान्य करून पोठडीत वाढ केली. उत्तर दरवाजातून एन्ट्री, रजिस्टरमध्ये नाव; जबाबामध्ये मात्र इन्कार
उत्तर दरवाजाच्या नोंदवहीमध्ये ३, ४, ५ आणि ११ एप्रिल २०२६ रोजी ७१ भाविकांची नोंद करण्यात आली आहे. हे सर्व भाविक विश्वस्त कडलग याचे नातेवाईक असल्याचे सांगत मंदिरात सोडण्यात आले. मात्र पोलिसांनी विचारणा केली असता, ‘हे लोक कोण आहेत हे मला माहीत नाही,’ अशी उडवाउडवीची उत्तर दिली.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks