वणीमध्ये गॅस वितरणाचा बोजवारा; 70 दिवसानंतरही मिळेना सिलिंडर:कडक उन्हात दोन-दोनतास रांगेत उभे राहून रिकाम्या हाताने परतण्याची वेळ
![]()
शहर व परिसरात गॅस वितरणाच्या विस्कळीत नियोजनामुळे ग्राहकांमध्ये असंतोष पसरला आहे. नियमानुसार ठराविक कालावधीत सिलिंडर मिळणे अपेक्षित असताना, ६० ते ७० दिवस उलटूनही पुरवठा होत नसल्याने गृहिणींचे स्वयंपाकघरातील नियोजन कोलमडले आहे. ऑनलाईन नोंदणी करूनही उन
.
वशिलेबाजी व काळा बाजाराचा आरोप : दिंडोरी-पिंपळगावला २१ दिवसांत सिलिंडर उपलब्ध होत असताना, वणीतच इतका विलंब का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
एजन्सीचे कार्यालय, गोडावून आणि प्रत्यक्ष वितरण केंद्र ही तिन्ही ठिकाणे वेगवेगळ्या भागात असल्याने ग्राहकांची मोठी पळापळ होत आहे. काही ग्राहकांचे मोबाईल क्रमांक अपडेट नसल्याचा गैरफायदा घेत त्यांच्या नावाचे सिलिंडर इतरांनाच दिले जात असल्याचा खळबळजनक आरोप नागरिकांनी केला आहे.
^आमच्याकडे १६ हजार ग्राहक आहेत. पूर्वी साडेआठ हजार सिलिंडरचा पुरवठा होत असे, तो आता ६ हजारांवर आला आहे. पुरवठा कमी असल्याने आम्ही बुकिंगनुसार ‘होम टू होम’ वितरण करत आहोत. ‘ज्याचे बुकिंग त्यालाच सिलिंडर’ हे तत्व आम्ही पाळत आहोत. – हेमंत बोथरा, संचालक इंडेन गॅस एजन्सी, वणी
१४ एप्रिलपर्यंत बुकिंग असलेल्या ग्राहकांनाच सिलिंडर : वितरणाचे नवीन वेळापत्रक: केवळ १४ एप्रिलपर्यंत बुकिंग असलेल्या ग्राहकांनाच सिलिंडर मिळणार आहे, असा संदेश वणी गॅस एजन्सीच्या वतीने ग्राहकांसाठी जारी करण्यात आला आहे.
