वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी आलेल्या रुग्णांची आर्थिक लुट होत असल्याचा प्रकार मंगळवारी ता. १७ सकाळी उघडकीस आल्यानंतर आरोग्य विभागाकडून कारवाईच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यामध्ये वैद्यकीय अधीक्षकाचा पदभार तडकाफडकी काढण्यात आला आहे. याबाबतचे आदेश जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नितीन तडस यांनी काढले आहेत वसमत तालु्क्यातील सुमारे ३० ते ३५ रुग्ण कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. सदर रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांनी सोमवारी ता. १६ रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने त्यांची आवश्यक तपासणीही केली. त्यानंतर मात्र रुग्णांच्या नातेवाईकांकडे आर्थिक रकमेची मागणी सुरु करण्यात आली. यामध्ये काही रुग्णांच्या नातेवाईकांकडून ५०० तर काही जणांकडून चक्क एक हजार रुपये उकळण्यात आले. या प्रकाराची माहिती काही रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्ण संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष मोईन कादरी यांना दिल्यानंतर कादरी यांनी तातडीने उपजिल्हा रुग्णालयात जाऊन रुग्ण्ांच्या नातेवाईकांशी संवाद साधला. यामध्ये बहुतांश नातेवाईकांनी पैसे दिल्याचे स्पष्ट केले. विशेष म्हणजे संतापलेल्या् रुग्णांच्या नातेवाईकांनी छायाचित्रीकरणात देखील पैसे दिल्याचे सांगून आपला रोष व्यक्त केला. या संदर्भात दैनिक दिव्य मराठीने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्तानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नितीन तडस यांनी तातडीने आरोग्य विभागाचे एक पथक चौकशीसाठी करावा लागेल. या पथकाने त्या ठिकाणी उपचारासाठी आलेल्या सर्व रुग्णांचे तसेच नातेवाईकांचे जवाब नोंदवले आहेत. याबाबतचा अहवाल अद्यापही जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे प्राप्त झाला नाही. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नितीन तडस यांनी तातडीने वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर जे. व्ही. काळे यांचा पदभार काढला आहे. त्या ठिकाणी आता डॉक्टर सौरभ मसारे यांची वैद्यकीय अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे या कारवाईमुळे प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली आहे. या संदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नितीन तडस यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर काळे यांचा पदभार काढला असून त्यांचा पदभार डॉक्टर मसारे यांच्याकडे सोपविला असल्याचे सांगितले. यासोबतच चौकशी पथकाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यावर सविस्तर अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला जाणार असल्याचे डॉ तडस यांनी स्पष्ट केले. What do you feel about this post? 0% Like 0% Love 0% Happy 0% Haha 0% Sad 0% Angry Views: 13 Facebook WhatsApp Twitter/X LinkedIn Post navigation सैफ अली खानला जिवे मारण्याची धमकी:बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील वाँटेड जीशानच्या नावाने आला संदेश; 2 वर्षांपूर्वी झाला होता चाकूहल्ला पंढरपुरात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक बिघाड:बॅटरी लो झाल्याने इंजिन सुरू होईना, अखेर कारने पुण्याकडे रवाना