नागपूरला एनजीओ जिहाद:चाैघींची धर्मांतराची तक्रार; अध्यक्षाला अटक, शिक्षण प्रसाराच्या नावाखाली संस्थेची स्थापना करून रियाज काझीचे सुरू होते अनेक गैरप्रकार
![]()
नाशिक येथील टीसीएस या कॉर्पोरेट कंपनीतील महिला लैंगिक अत्याचार, धर्मांतराचे प्रकरण धगधगत असतानाच नागपूर येथील मानकापूर भागातील एका एनजीओतील (गैर सरकारी संस्था) जिहादची घटना उघडकीस आली आहे. युनिव्हर्सल मल्टिपर्पज सोसायटी असे या एनजीओचे नाव आहे. या संस्थेचा अध्यक्ष रियाज काझीने महिलांचे लैंगिक शोषण केले. त्यांचा मानसिक छळ केला. त्यांना धमकावले. मुस्लिम धर्माच्या कार्यात सहभागी होण्यासाठी जबरदस्ती केली. त्याच्याविरोधात चार पीडितांनी पोलिसात तक्रार केल्यावर त्याला अटक झाली. त्याचा मोबाइल जप्त करण्यात आला असून न्यायालयाने त्याची २३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. वेबसाइटवर बँक खात्याचा तपशील देऊन गोळा करत होता रक्कम नोकरीवरून काढून जिवे मारण्याचीही धमकी
1 रियाज वर्षभरापासून त्यांचा छळ, शोषण करत होता.
2 धार्मिक कार्यात सहभागी होण्यासाठी जबरदस्ती.
3 नकार दिल्यास नोकरीवरून काढून जिवे मारण्याची, सर्रास धमकी देत होता.
4 नोकरी सोडण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्या कुटुंबीयांना धमक्या देत होता.
5 महिलांना मुस्लिम धर्मीयांनुसार कपडे घालण्यास व त्यांच्या चालीरीती पालन करण्यास भाग पाडत होता. बनावट इन्स्टा खाते काढले होते रियाज त्याच्या संस्थेतील हिंदू तरुणींवर रमजानमध्ये रोजा ठेवणे, नियमित नमाज पठणासाठी दबाब टाकत होता. तो बनावट इन्स्टाग्राम खाते तयार करून या तरुणींवर नजर ठेवत होता. तरुणींच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्यांना त्रास देत होता. नेटवर्कचा तपास केला जाणार आरोपी रियाजचे धर्मांतराचे नेटवर्क नेमके कसे चालत होते, त्याला इतर काही संस्था मदत करत होत्या का, याचा तपास केला जाणार आहे. दरम्यान, सूत्रांनी सांगितले की, त्याच्या संस्थेला अमेरिका, बेंगळुरू येथून निधी मिळत होता, असे निदर्शनास आले आहे. दहा वर्षांपासून कारनामे : अमेरिका, बेंगळुरूतून मिळत होता निधी रियाजने त्याच्या संस्थेच्या वेबसाइटवर स्वत:ला एक अनुभवी समाजसेवक म्हटले आहे. एक दशकाहून अधिक काळात मी समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणणाऱ्या अनेक प्रकल्पांचे यशस्वी नेतृत्व केले, असे त्याने नमूद केले आहे. याच वेबसाइटवर त्याने संस्थेच्या बँक खात्याचा सविस्तर तपशील दिला आहे.त्यावर तो ‘हम पढे, पढाये हम’ या मोहिमेच्या नावावर रक्कम गोळा करत असावा, असे दिसते.
