आयुष व्यसनमुक्ती केंद्राची नशामुक्तीवर कार्यशाळा:सफाई कामगारांचा जिल्हा नशामुक्तीचा निर्धार‎

0
250_177651891569e387031647a_33620942864.jpg




जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग व सोलापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच जामगाव (ता.बार्शी) येथील आयुष व्यसनमुक्ती उपचार व संशोधन केंद्र यांच्या पुढाकारातून सोलापूर महापालिकेतील सफाई कामगारांसाठी शुक्रवारी (दि.१७) हुतात्मा स्मृती मंदिर येथे नशामुक्ती कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत सुमारे ३५० महिला व पुरुष सफाई कामगारांनी सहभाग घेत सोलापूर जिल्हा नशामुक्त करण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यशाळा सामाजिक न्याय मंत्रालयाच्या नशामुक्त भारत अभियान अंतर्गत आयोजित केली होती. जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यात विविध नशामुक्ती उपक्रम राबविण्यात येत आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले तसेच समाजकल्याण निरीक्षक स्वाती गायकवाड उपस्थित होते. कार्यशाळेत विविध तज्ञांनी मार्गदर्शन केले. . सूत्रसंचालन मृणालिनी मोरे यांनी केले. शिवाई इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कॉलेज, उमरगा येथील विद्यार्थ्यांनी उपस्थित कामगारांचे मानसिक आरोग्य तपासणी व मूल्यांकन केले.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Enable Notifications OK No thanks