100 हून अधिक घरी चारचाकी; 60 कुटुंबांचा ‘गृहप्रवेश’चा योग:इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या विक्रीत 10 टक्क्यांची वाढ‎

0
240_177652329869e3982270640_goldornaments.jpg




वर्षभरातील साडे तीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या उद्या, रविवारच्या अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर नागरिकांनी घर, फ्लॅट, प्लॉट, शेती, दागीने, वाहने आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंच्या बुकींग तसेच खरेदीकडे मोर्चा वळविला आहे. यासंदर्भात सदर प्रतिनिधीने संबंधित व्यसायिकांशी संपर्क साधला असता भाववाढ आणि इतर बाबींचा यावर कोठलाही परिणाम झाल्याचे पुढे आले नाही. उलट गतवर्षीच्या तुलनेत यामध्ये बऱ्यापैकी वाढ असल्याची वास्तविकता त्यांनी स्पष्ट केली. दरम्यान उद्या, रविवारी शहरातील सुमारे ६० कुटुंब नव्या घरात प्रवेश करणार आहेत. काहींनी गुंतवणुकीचे उत्तम पर्याय तर काहींनी गरज म्हणून सोने-चांदी व डायमंड ज्वेलरीला पसंत केले आहे. घर, फ्लॅट, प्लॉट आणि शेतीच्या बाबतीतही असेच आहे. आजची खरेदी म्हणजे भविष्यातील फायदा, असे सूत्र या व्यवहारामागे असल्याचे काही खरेदीदारांनी सांगितले. अमरावती महानगरात चारचाकी वाहनांपासून ते गृहपयोगी वस्तूंचे उर्वरित.पान,४ इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंच्या विक्रीत १० टक्के वाढ ^गतवर्षीप्रमाणेच यावर्षीही टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन आणि एसी सयंत्राला ग्राहकांनी पसंती दर्शविली आहे. नव्या घरांसाठी नव्या वस्तू लागतात म्हणूनही नागरिकांनी त्याकडे आपला मोर्चा वळवला आहे. बुकींगबद्दल बोलायचे तर गतवर्षीच्या तुलनेत ८ ते १० टक्के वाढ आहे. यात यापेक्षाही अधिक वाढ झाली असती, परंतु सध्याची युद्धजन्य स्थिती पाहू जाता स्पेअर पार्टस् च्या किंमतीत मोठी वाढ झाली असल्याने त्याचा काहीसा परिणाम बुकींगवरही झाला आहे. – निलेश साबू, संचालक, दूरदर्शन (इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे दालन) ‘मारुती’ कंपनीचे शहरात दोन शो रुम आहेत. येथून मारुतीच्या सर्वच चारचाकी वाहनांची विक्री केली जाते. याबाबत संचालक रणजीत बंड म्हणाले, अरिना (शोरुमचे नाव) येथून उद्या, रविवारी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर साधारणत: ४५ वाहनांची डिलीव्हरी केली जाईल. त्याचवेळी नेक्सा या शोरुममधून १७ वाहनांच्या चाव्या खरेदीदारांना दिल्या जाणार आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षीही नागरिकांनी मारुतीच्या वाहनांना बऱ्यापैकी पसंती दर्शविली आहे. बुकींगसह, गृहप्रवेशाचाही बेत ^घर हे प्रत्येकाचे स्वप्न असते. त्यातही त्याला मुहूर्ताची जोड ही ठरलेलीच. यावर्षीदेखील अनेकांनी गेल्या महिनाभरापासूनच आज, शनिवारपर्यंत बुकींगकडे कल वळविला आहे. गेल्या महिनाभरात सुमारे १२० नागरिकांनी बुकींग केले. यापैकी निम्म्या खरेदीदारांनी खरेदीचा व्यवहार पूर्ण केला असल्याने ते उद्या, रविवारी अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर गृहप्रवेश करणार आहेत. तर साधारणत: तेवढ्याच नागरिकांनी उद्याच्या मुहूर्तावर व्यवहार पूर्ण करण्याचे ठरविले आहे. – राजन पाटील, अध्यक्ष, क्रेडाई. सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने चमकले ^अक्षय्य तृतीया या वर्षभरातील साडे तीन मुहूर्तांपैकी एक आहे. त्यामुळे या मुहूर्तावर शुभकार्य आदीच्या अनुषंगाने सोन्याचे दागीने आणि डायमंड ज्वेलरीला ग्राहकांनी बऱ्यापैकी पसंत केले आहे. सोने-चांदीचे दर वाढले असले तरी गतवर्षीच्या तुलनेत ग्राहकांच्या संख्येत वाढच झाली आहे. – बापूसाहेब कारवाड, सेल्स हेड, पीएनजी, अमरावती.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks