Rohit Pawar Claims Pilots Fear Flying VSR Planes Post Ajit Pawar Accident

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-02-19t213828121_1776571898.jpg


अजितदादांच्या बारामती येथील विमान अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असतानाच, आता या प्रकरणातील दोषींवर कारवाईसाठी आमदार रोहित पवार आक्रमक झाले आहेत. ज्या ‘व्हीएसआर’ (VSR) कंपनीच्या विमानात हा अपघात झाला, त्या कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांच्याविरोध

.

व्हीएसआर कंपनीची नुकतीच झालेली बैठक वादळी ठरली आहे. कंपनीची विमाने सदोष असल्याचा आरोप कंपनीचे कर्मचारी आणि पायलटने केला आहे. कंपनी कर्मचाऱ्यांच्या या आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली असून, याविषयीचा खुलासा आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत, महाराष्ट्रातील काही नेत्यांचा वरदहस्त असल्याचाही आरोप केला आहे.

नेमके काय म्हणाले रोहित पवार?

रोहित पवार आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की, “अजितदादांच्या विमान अपघाताला कारणीभूत असलेल्या VSR कंपनीची बहुतांश विमाने सदोष असून उड्डाणासाठी अत्यंत धोकादायक असल्याने आता कंपनीचे पायलट आणि क्रू मेंबर यांना देखील अपघाताची भीती वाटतेय. दोन-तीन दिवसांपूर्वी झालेल्या कंपनीच्या बैठकीत पायलट आणि इतर कर्मचाऱ्यांनी सदोष विमानात बसण्याची भीती बोलून दाखवली, परंतु सरकारमधील काही लोकांचा वरदहस्त असल्याने ‘सरकार आपल्या पाठीशी आहे, घाबरू नका’ असा शाब्दिक धीर त्यांना देण्यात आला. पण दुर्दैवाने अपघात झाला तर व्यवस्थापनाने त्यांना दिलेल्या या शाब्दिक धीराने त्यांचा जीव वाचणार आहे का, असा प्रश्न पडतो.”

व्ही. के. सिंग सरकारपेक्षाही वरचढ झाला का?

“एकीकडे अजितदादांच्या अपघातानंतर महाराष्ट्र सरकारने VSR कंपनीची ८० कोटींची बिलं अदा केली, दुसरीकडे नियम आणि कायद्यांना पायदळी तुडवूनही VSR कंपनीवर अद्यापही कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळंच या कंपनीचा मालक व्ही. के. सिंग याला कुणाचीही भीती राहिली नसून दिवसेंदिवस त्याची गुर्मी वाढतच चालल्याचं दिसतंय..! तो सरकारपेक्षाही वरचढ झाला का? ज्यामुळं सरकार त्यावर कारवाई करायला घाबरतंय!” अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.

दरम्यान, विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच आता उघडपणे भीती व्यक्त केल्यामुळे, व्हीएसआर कंपनीच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या दाव्यांनंतर आता राज्य सरकार आणि नागरी विमान वाहतूक संचालनालय (DGCA) यावर काय पावले उचलणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा…

चालक-वाहकाच्या स्टंटबाजीमुळे चिमुकल्याचा बळी:रील बनवण्यात दंग असताना बसचा अपघात, 25 जण जखमी; समृद्धी महामार्गावरील घटना

सोशल मीडियावरील ‘रील’ बनवण्याचे वेड किती जीवघेणे ठरू शकते, याचा भयावह अनुभव समृद्धी महामार्गावर आला आहे. चालक आणि वाहक रील बनवण्याच्या नादात असताना, मुंबईहून पुसदकडे जाणाऱ्या एका खाजगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. या अपघातात एका दीड वर्षीय निष्पाप चिमुकल्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून, २५ प्रवासी जखमी झाले आहेत. सविस्तर वाचा…

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks