श्रीराम महाराज मेहुणकर जन्मशताब्दी उत्सव:"पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती, अच्युत महाराज दस्तापूरकर, श्रीराम महाराजांची गायली थोरवी‎

0
240_177651217469e36caec350f_18mehunkarmah.jpg




प्रतिनिधी |अकोला भक्तांचे आराध्य वै.श्रीराम महाराजांचे कार्य हे या शताब्दी महोत्सवात उपस्थित भक्तांच्या उपस्थितीमुळे दिसून येत आहे. ज्ञानोबारायानंतर प्रत्यक्ष पुढची पिढी मारुती बाबा कुरेकर यांची घडली .त्यांनी श्रीराम महाराजांचे अद्भुत वर्णन करून त्यांच्या कार्याची थोरवी गायली आहे. त्यामुळे अंत्री गावी संतांचे सिंहस्थ पर्व या माध्यमातून प्रारंभ झाले असून, ही महाराजांची अद्भुत शताब्दी पर्वणी आहे, असा हितोपदेश परभणी येथील कीर्तनकार अच्युत महाराज दस्तापूरकर यांनी केला. वै.श्रीगुरु श्रीराम महाराज मेहुणकर यांच्या जन्मशताब्दी महोत्सवात निंबा परिसरातील अंत्री मलकापूर येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवात अच्युत महाराज दस्तापूरकर यांनी कीर्तनाचे द्वितीय पुष्प सादर केले.” पवित्र ते कुळ, पावन तो देश,जेथे हरीचे दास जन्म घेती,” या भजनांतून या वेळी श्रीराम महाराजांची थोरवी साकार केली.अच्युत महाराज पुढे म्हणाले यांनी धन्य ते संसारी,दयावंत जे अंतरी,येथे उपकारासाठी, आले घर ज्या वैकुंठी,लटिके वचन,नाही देही उदासीन,मथुरा वाणी होटी, तुका म्हणे वाव पोटी”या तुकोबारायांच्या अभंगावर निरूपण केले. या वेळी त्यांनी वैकुंठवासी श्रीराम महाराज यांच्या थोर वारकरी विकास कार्याची उपस्थितांना जाणीव करून दिली. ते पुढे म्हणाले कि श्रीराम महाराजांचे प्रत्यक्ष ज्यांना दर्शन झाले ते धन्य होत. श्रीराम महाराजांची थोरवी व कार्य अद्भुत होते. आदिशक्ती मुक्ताबाईंच्या मंदिराचा जीर्णोद्धार,संत तुकोबारायांच्या मंदिराच्या कळसाचा जीर्णोद्धार शेगावच्या गजानन महाराज मंदिरात श्रीराम महाराजांनी कीर्तन करून कीर्तन परंपरेची शेगाव मंदिरापासून सुरुवात केली. त्यांच्यामुळेच शेगाव संस्थानने वारकरी,टाळकऱ्यांना टाळ मृदंग आदींचे वितरण करणे सुरू करून ही परंपरा श्रीराम महाराजांच्या माध्यमातून निर्माण झाल्याचे दस्तापूरकर यांनी सांगितले. यावर केले निरूपण आपल्या उर्वरित कीर्तनात दस्तापूरकर महाराज यांनी संत तुकोबाराय यांच्या भक्तीची महिमा यावर निरूपण करीत संत परंपरेवर व तुकोबारायांच्या भक्तीवर विवेचन केले. आयोजन समितीतर्फे अच्युत महाराज यांचे स्वागत केले . २३ एप्रिल पर्यंत आयोजित या महोत्सवात गाथामूर्ती ज्ञानेश्वर महाराज कदम,मोठे माऊली आळंदी यांचे कीर्तन होणार आहे.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks