पिंपळगावी खरेदीचा ‘अक्षय्य’ उत्साह:सीएनजी व ईव्ही वाहनांना मिळाली अधिक पसंती‎

0
242_177652134669e390821c2a7_pimpalgaonsone1.jpg




साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने सोने-चांदीच्या दागिन्यांसह वाहन खरेदीवर नागरिकांतर्फे भर दिला जातो. मुहूर्त साधन्यासाठी नागरिकांनी १२ चारचाकी आणि २५० हून अधिक दुचाकींची बुकींग केली आहे. घरांच्या आगाऊ बुकिंगलाही चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे बाजारपेठेत पुन्हा तेजी दिसली. महामार्गावरील महत्त्वाचे शहर म्हणून ओळख असलेले पिंपळगाव बसवंत झपाट्याने विकसित होत आहे. द्राक्ष उत्पादकांची मोठी संख्या आणि येथील मोठी बाजार समिती यामुळे आर्थिक उलाढाल वाढत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील ऑटोमोबाईल शोरूम्समध्ये अक्षय्यतृतीयेसाठी आगाऊ बुकिंग पूर्ण झाले आहे. १२ चारचाकी वाहने, २५० दुचाकींची बुकींग झाली. वाढत्या इंधन दरांमुळे सीएनजी कार ख‌रेदीला ग्राहक पसंती देत आहेत तर ईव्हीकडे पर्यावरणपूरक पर्याय म्हणून पाहीले जात असल्याने त्यांची मागणी वाढल्याचे दिसून आले. उन्हाळ्यामुळे एसी आणि फ्रीजच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत २५ टक्के वाढ झाली आहे. मोबाईल मार्केटमध्ये सवलतींमुळे नवीन मॉडेल्सच्या विक्रीतून कोट्यवधींची उलाढाल होईल.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks