लोकप्रतिनिधी तात्पुरते, अधिकारी कायमचे; जनतेची कामे वेळेत करा:पाटोद्यात महसूल समाधान शिबिर; सभापती सचिन गरड यांचे आवाहन‎

0
240_177652737769e3a811a0fec_39237684457.jpg



लोकप्रतिनिधी दर पाच वर्षांनी बदलतात, मात्र प्रशासकीय अधिकारी कायमस्वरूपी सेवेत असतात. त्यामुळे जनतेची कामे तत्काळ मार्गी लावण्याची मोठी जबाबदारी अधिकाऱ्यांची आहे. जर अधिकाऱ्यांनी आपली कर्तव्ये वेळेवर पार पाडली असती, तर आज अशा शिबिरांची गरजच भासली नसत

.

आदर्श ग्राम पाटोदा येथे महसूल विभाग व पंढरपूर मंडळाच्या वतीने आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, तहसीलदार उमेश पाटील, माजी सरपंच भास्कर पेरे, उपसभापती बाळासाहेब गाढे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. शिबिरात सातबारा वाटप, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना आणि कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ शेकडो लाभार्थींना जागेवरच देण्यात आला.

तहसीलदार उमेश पाटील यांनी अभियानामागील हेतू स्पष्ट केला, तर उपसरपंच कपिंद्र पेरे यांनी पाटोदा गावाने राबवलेल्या विकासकामांचा आढावा घेत गाव कसे ‘स्मार्ट’ बनले, याची माहिती दिली. या शिबिराला पंढरपूर मंडळातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य सेविका आणि ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती. अडचणी आल्यास लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सहकार्य करू, मात्र कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही सचिन गरड यांनी शेवटी दिला.

पंढरपूर गावातील घरे नियमित करा माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड यांनी पंढरपूर गाव सध्या अनियमित असल्याने नागरिकांना येणाऱ्या अडचणी मांडल्या. महसूल विभागाने सर्व घरे नियमित करून गावठाण मंजूर करण्याची मागणी त्यांनी केली. यावर उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड यांनी २०११ पूर्वीच्या वसाहतींमधील अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय जाहीर केला. यामुळे शेकडो नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks