‘फळांचा राजा’ दाखल, पण गोडवा दीड पटीने महागला:अक्षय तृतीयेच्या मुहूर्ताच्या खरेदीसाठी शहरातील बाजारपेठा सजल्या, पण चवीला महागाईचा रंग
![]()
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या सणाला आमरसाचा नैवेद्य दाखवण्याची जुनी परंपरा आहे. याच पार्श्वभूमीवर अहिल्यानगरच्या बाजारपेठेत फळांचा राजा मानल्या जाणाऱ्या आंब्याचे मोठ्या प्रमाणात आगमन झाले आहे. बाजारपेठ केसरी व पिवळ्या रंगाने उज
.
शहरातील मुख्य बाजारपेठ, माळीवाडा, कोठला, उपनगरातील प्रोफेसर कॉलनी चौक, भिस्तबाग चौक, पारिजात चौक या परिसरात, तसेच महामार्गाच्या कडेला आंब्याचे स्टॉल्स सजले आहेत. यात प्रामुख्याने रत्नागिरी व देवगड हापूस आपली टिकवून आहे. त्यासोबतच केसर, पायरी, बदाम, लालबाग यांसारख्या विविध जातींचे आंबे दाखल झाले आहेत. चवीला गोड आणि रसाळ असलेल्या रत्नागिरी व देवगड हापूस आंब्याला मध्यमवर्गीयांकडून मोठी मागणी दिसून येत आहे.
नगरच्या बाजारपेठेत प्रामुख्याने कोकणातून (रत्नागिरी, सिंधुदुर्ग) हापूसची उर्वरित पान ४
नैसर्गिकरीत्या पिकवलेल्या फळांना पसंती यंदा बाजारपेठेत रासायनिक औषधे वापरून पिकवलेल्या आंब्यापेक्षा नैसर्गिकरीत्या अढी लावून पिकवलेल्या आंब्याला ग्राहक अधिक पसंती देत आहेत. आरोग्याबाबत जागरूक असलेले नगरकर जादा पैसे मोजून सेंद्रिय केसर आणि हापूस आंबा खरेदी करत आहेत. फळांचा नैसर्गिक सुगंध आणि टिकण्याची क्षमता हे यंदाचे मुख्य आकर्षण आहे.
सध्या आवक दुपटीने वाढली ^ सणासुदीच्या काळात व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात साठा उपलब्ध केला आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत सध्या आवक दुपटीने वाढली आहे. ‘ खिशाला थोडी कात्री बसत असली तरी नागरिक मुहूर्ताचा आंबा खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी करत आहेत. – कैलास आहुजा, विक्रेते.
