गगनयान ते नासाची चांद्रमोहीम; नगरमधील विद्यार्थ्यांची विज्ञानाकडे झेप:सावेडीतील समर्थ प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी उत्साहात साजरा केला
![]()
१२ एप्रिल १९६१ रोजी सोव्हिएत-रशियन अंतराळवीर युरी गागरिन यांनी ‘व्होस्टोक १’ या अंतराळ यानातून पृथ्वीची पहिली प्रदक्षिणा पूर्ण केली होती. भारताच्या इस्त्रोच्या “गगनयान” या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेची दुसरी एकात्मिक हवाई चाचणी नुकतीच १० एप्रिल रोजी
.
या निमित्ताने सावेडीच्या श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला, माध्यमिक विभागाच्यावतीने संयुक्त राष्ट्र महासभेच्यावतीने निर्धारित “आंतरराष्ट्रीय मानव अंतराळ उड्डाण दिवस” साजरा करण्यात आला. याकामी डॉ.अमोल बागुल यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळाचे सचिव सुरेश क्षीरसागर, प्राचार्या वसुधा जोशी उपस्थित होते. शालेय समिती चेअरमन ॲड. किशोर देशपांडे यांचे विशेष मार्गदर्शन या उपक्रमाला लाभले. २ एप्रिल ते १२ एप्रिल या कालावधीतील नासाच्या आर्टीमिस-२ या ४ अंतराळवीरांच्या चांद्र मोहिमेच्या १० दिवसांचा प्रवास विद्यार्थ्यांना ऑनलाइन दाखवण्यात आला. विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले.
क्षीरसागर म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या मनामध्ये मानवजातीच्या अंतराळ युगाच्या सुरुवातीचे स्मरण करणे, शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या योगदानाचा गौरव करणे आणि शांततापूर्ण हेतूंसाठी बाह्य अवकाशाचा वापर करण्याच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देणे. यासाठी हा उपक्रम विशेष महत्त्वाचा वाटतो.” विज्ञान शिक्षिका द्वारका खिलारी यांच्या प्रयत्नातून विद्यार्थ्यांनी सूर्यमालेची विविध शेकडो स्वयंचलित शैक्षणिक साहित्य साधने तयार करून उपक्रमात सहभाग घेतला. प्रास्ताविक प्राचार्या जोशी यांनी केले तर आभार पर्यवेक्षक लक्ष्मीकांत कुलकर्णी यांनी मानले.
