मनपाचे कामकाज पारदर्शक करण्यावर भर:विधी समिती सभापती स्नेहा लुल्ला, उपसभापती डॉ. मधुरा कहाळे यांचे पदग्रहण
![]()
कामकाज अधिक पारदर्शक, गतिमान, लोकहिताचे करण्याचा संकल्प पदग्रहण करताना विधी समिती सभापती स्नेहा लुल्ला यांनी व्यक्त केला. शहरातील विकासकामांना कायदेशीर चौकटीत गती देण्यावर भर दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. उपसभापती डॉ. मधुरा कहाळे यांनीही आपल्या मन
.
महानगरपालिकेच्या विधी समितीच्या नवनिर्वाचित सभापती स्नेहा लुल्ला व उपसभापती डॉ. मधुरा कहाळे यांचा पदग्रहण समारंभ उत्साहात, शिस्तबद्ध वातावरणात झाला. महानगरपालिकेतील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमास महापौर श्रीचंद तेजवानी, उपमहापौर सचिन भेंडे, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, सभागृह नेता चेतन गावंडे, परम पूज्य संत डॉ. संतोषदेव महाराज, शिवसेना उपनेता प्रीती बंड, युवा स्वाभिमान पार्टीचे कार्याध्यक्ष सुनील राणा, जिल्हा प्रमुख संतोष बद्रे, गटनेता नाना आमले, गटनेता डॉ. राजेंद्र तायडे, माजी पालकमंत्री जगदीश गुप्ता, शिक्षण समिती सभापती अॅड. प्रीती रेवणे, शहर सुधार समिती सभापती राधा कुरील, महिला व बाल कल्याण समिती सभापती सौ. ममता आवारे, उपसभापती सौ. लता देशमुख, सन्मा. नगरसेवक आशिष अतकरे, प्रदीप हिवसे, संजय गव्हाळे, अजय जयस्वाल, विनोद तानवैस, सचिन वैद्य, मनीष बजाज, इस्माईल लालुवाले, योगेश विजयकर, मोहंमद रेहान मोहमद यासीन, संजय तीरथकर, नगरसेविका पद्मजा कौंडण्य, स्वाती कुलकर्णी, माधुरी ठाकरे, अर्चना पांडे, अर्चना पाटील, विद्या माटे, स्मिता सूर्यवंशी, मंजुषा जाधव, प्रियंका पाटणे, आशिष लुल्ला, मिलिंद कहाळे, शिवसेनेचे पदाधिकारी, अधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित विधी समिती सभापती स्नेहा लुल्ला व उपसभापती डॉ. मधुरा कहाळे यांचा पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित विधी समिती सभापती स्नेहा लुल्ला व उपसभापती डॉ. मधुरा कहाळे यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
समारंभाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संबंधित अधिकाऱ्यांनी केले. या पदग्रहण समारंभामुळे महापालिकेच्या विधी समितीच्या कामकाजाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
