[ads1]
![]()
डिलिव्हरी आयडी बंद झाल्याच्या कारणावरून झालेला वाद चांगलाच विकोपाला गेला. माफी मागण्यासाठी भेटायला बोलावलेल्या फूड डिलिव्हरी कर्मचाऱ्यावर कोयता आणि पट्ट्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमधील काळेवाडी भागात घडली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, पोलिसांनी या प्रकरणातील एका महिला व्यवस्थापकाला अटक केली आहे. नेमक काय आहे प्रकरण सुंदरम लालचंद यादव (वय 25 , रा. राहाटणी) हे ‘जिपीओ लॉजिस्टिक’ या फूड डिलिव्हरी कंपनीत काम करतात. काही दिवसांपूर्वी त्यांचा डिलिव्हरी आयडी अचानक बंद झाला. याबाबत त्यांनी कंपनीतील फिल्ड मॅनेजर आशु मॅडम यांच्याशी फोनवर संपर्क साधला. यावेळी दोघांमध्ये जोरदार वाद झाला. फोनवरील वादानंतर आशु मॅडमने सुंदरम यांना पुन्हा फोन केला. झालेल्या वादाबद्दल माफी मागण्यासाठी काळेवाडीतील पाचपीर चौकात येण्यास तिने सांगितले. तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून सुंदरम गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास पाचपीर चौकात पोहोचले. मात्र, तिथे पोहोचताच त्यांना वेगळ्याच परिस्थितीला सामोरं जावं लागलं. आशु मॅडम, तिचा पती कांतीलाल आणि काही साथीदार आधीच तिथे उपस्थित होते. सुंदरम यांना घेरल्यानंतर ओंकार नावाच्या आरोपीने त्यांच्यावर धारदार कोयत्याने हल्ला केल्याचा आरोप आहे. डोकं, हात आणि कानावर कोयत्याने वार करण्यात आले. त्यानंतर इतर साथीदारांनी पट्ट्याने मारहाण केल्याने सुंदरम गंभीर जखमी झाले. रक्तबंबाळ अवस्थेत सुंदरम यांनी काळेवाडी पोलीस ठाणे गाठत संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी कारवाई सुरू केली. पोलिसांकडून कारवाई या घटनेप्रकरणी काळेवाडी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आशु मॅडम हिला अटक केली आहे. तिचा पती कांतीलाल (रा. गव्हाणे वस्ती, भोसरी) याच्यासह ओंकार, सोहम, निखिल आणि राज यांच्याविरोधात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, इतर आरोपींचा शोध सुरू असून, हल्ल्यामागील नेमकं कारण आणि आरोपींची भूमिका याचा पोलीस तपास करत आहेत. हेही वाचा.. राष्ट्रवादी पक्ष एकच अन् तो शरद पवारांचाच:पक्षाची घटना डावलून आमच्यावर अन्याय झाला; सर्वोच्च न्यायालयात न्यायाची अपेक्षा- सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकच आहे. राष्ट्रवादी पक्षाची स्थापना ही शरद पवार यांनी केली आहे. चुकीच्या पद्धतीने त्यांच्याकडून पक्ष काढून घेण्यात आला. पक्षाचे संविधान बघितले तर हा आमच्यावर अन्याय करण्यात आला. या संदर्भात आमची सुप्रीम कोर्टात लढाई सुरू आहे. तो पक्ष शरद पवारांना परत करावा हीच आमची मागणी आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.सविस्तर वाचा..
[ads2]
पुण्यात डिलिव्हरी बॉयवर कोयत्याने जीवघेणा हल्ला:महिला मॅनेजरसह पाच जणांवर गुन्हा, डिलिव्हरी आयडी बंद झाल्याच्या वादातून थरार
















Leave a Reply