Asha Bhosle | आशा भोसलेंची तब्बेत बिघडली; ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, नात जनाईने दिली हेल्थ अपडेट

0
Asha-Bhosle.webp.webp


Asha Bhosle | बॉलिवूडमधील दिग्गज गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना तातडीने मुंबई (Mumbai) येथील ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत सुरुवातीला विविध अंदाज वर्तवले जात होते, मात्र कुटुंबीयांकडून आता यासंदर्भात स्पष्ट माहिती देण्यात आली आहे.

नातीने जनाईने सांगितली हेल्थ अपडेट

९२ वर्षीय आशा भोसले यांना प्रकृती बिघडल्यामुळे रुग्णालयात हलवण्यात आले असून सध्या त्यांच्यावर आपत्कालीन वैद्यकीय विभागात उपचार सुरू आहेत. डॉक्टर त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. त्यांच्या तब्येतीबाबत बातमी समोर येताच चाहत्यांमध्ये चिंता वाढली होती आणि हृदयविकाराच्या झटक्याबाबतही चर्चा सुरू झाली होती. मात्र, त्यांच्या नात जनाई भोसले (Zanai Bhosle) हिने सोशल मीडियावर स्पष्ट केले की, आशा भोसले यांना तीव्र अशक्तपणा आणि छातीतील संसर्ग (Chest Infection) झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करावे लागले. तिनं पोस्टमध्ये गोपनीयतेचा आदर करण्याची विनंती केली असून उपचार सुरू असून लवकरच त्या बऱ्या होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्याबाबतची पुढील माहिती लवकरच सर्वांसोबत शेअर केली जाईल, असंही स्पष्ट केलं. यामुळे त्यांच्या चाहत्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

संगीत क्षेत्रातील अजरामर योगदान

भारताच्या गानकोकिळा स्व. लता मंगेशकर यांच्या धाकट्या भगिनी असलेल्या आशा भोसले यांनी भारतीय सिनेसृष्टीत (Hindi Film Industry) सहा दशकांहून अधिक काळ आपल्या आवाजाची मोहिनी घातली आहे. त्यांनी आर. डी. बर्मन (R.D. Burman), ओ. पी. नैय्यर (O.P. Nayyar), सचिन देव बर्मन (S.D. Burman) आणि लक्ष्मीकांत-प्यारेलाल (Laxmikant-Pyarelal) यांसारख्या दिग्गज संगीतकारांसोबत काम करून अनेक अजरामर गाणी दिली आहेत. ‘दम मारो दम’ आणि ‘ओम शांती ओम’ यांसारखी त्यांची गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत.

केवळ हिंदीच नव्हे, तर मराठी, बंगाली, गुजराती, तमिळ आणि तेलगू यांसह अनेक प्रादेशिक भाषांमध्ये त्यांनी हजारो गाणी गायली आहेत. त्यांच्या गायकीतील वैविध्य आणि ऊर्जेमुळे त्यांना ‘वर्सटाईल’ गायिका म्हणून ओळखले जाते. आजही वयाच्या ९२ व्या वर्षी त्या कलेच्या क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांच्या निधड्या आवाजाने जागतिक स्तरावर भारतीय संगीताची मान उंचावली असून, त्या लवकरच बऱ्या होऊन घरी परततील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed