अभिनेता अंकुर वाढवेवर पुसदमध्ये प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न:20-30 जणांच्या टोळीने घेरले, फेसबुक पोस्टद्वारे सांगितली आपबिती

0
db-temp-cover-marathi-2026-05-30t183810741_1780146695.jpg




‘चला हवा येऊ द्या’ फेम प्रसिद्ध अभिनेता अंकुर विठ्ठलराव वाढवे याच्यावर २९ मे २०२६ रोजी पुसदमध्ये प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुमारे २० ते ३० लोकांच्या टोळीने हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र सुदैवाने पोलिसांच्या मध्यस्थीमुळे मोठा अनर्थ टळला आहे. अंकुर वाढवेने फेसबुक पोस्ट आणि लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून त्याच्यावर ओढावलेली आपबिती सांगितली असून, पुसदमध्ये वाढलेल्या गुन्हेगारीवर चिंता व्यक्त केली आहे. अंकुर वाढवे सध्या पुसदमध्ये एका सिनेमाच्या चित्रीकरणासाठी आला आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार, या सिनेमाचा भाग असलेले काही मित्र त्याला भेटायला आले होते. त्यातील काही जणांनी मद्यपान केले होते आणि ते शेजारच्या घरावर लघुशंका करत होते. या प्रकाराला अंकुर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी विरोध केला आणि त्यांना परत पाठवले. या गोष्टीचा राग धरून, संबंधित तरुण ३० ते ४० जणांचे टोळके घेऊन मारहाण करण्यासाठी घटनास्थळी आला. यावेळी टोळीतील काही लोकांनी अंकुरला ओळखले, त्यामुळे परिस्थिती अधिक चिघळली नाही. वसंत नगर पोलीस स्टेशनच्या मध्यस्थीने हा संभाव्य हल्ला टळला. अंकुरने फेसबुकवर एका पोस्ट करत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. आपल्या पोस्टमध्ये तो म्हणाला, “काल पुसद मधे माझ्यावर २० ते ३० लोकांच्या टोळक्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला वसंत नगर पोलीस स्टेशन च्या मध्यस्थी ने प्रकरण टळल पण यावरून लक्षात येते की पुसद मधे गुन्हेगारी वाढलेली आहे यावर प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.” अंकुरने फेसबुक लाइव्ह करत सांगितली आपबिती अंकुरच्या या पोस्टनंतर त्याला अनेक फोन कॉल्स येऊ लागले. त्याचा मित्र वर्ग आणि चाहते त्याची विचारपूस करत होते. यानंतर अंकुरने फेसबुकवर लाईव्ह येत घडलेला सर्व प्रकार सांगितला आणि आपण ठीक असल्याची माहिती दिली. अंकुर त्याच्या लाईव्हमध्ये म्हणाला, “नमस्कार. मला काही झालेले नाही. पुसदमध्ये सिनेमाचे शुटिंग सुरू होते. या सिनेमाचा भाग असणारे माझे मित्र भेटायला आले होते. त्यात काही असे जण होते, ज्यांनी मद्यपान केले होले. ते आमच्या शेजारच्या घरावर लघुशंका करत होते. परिस्थिती चिघळू नये म्हणून, आम्ही त्यांना रिटर्न पाठवले. तिथे एक मुलगा होता, ज्याची चूक होती, तो एकटा 30-40 जण मारहाण करण्यासाठी घेऊन आला होता. यावेळी त्यातील काही लोकांनी मला ओळखले. परिस्थिती अधिक चिघळू नये म्हणून आम्ही ते प्रकरण तेव्हाच सोडून दिले.” अंकुर म्हणाला, “सकाळी मला जाणवले की पुसदमध्ये गुन्हेगारी वाढली आहे. मी पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधून तक्रार दाखल करायची आहे, असे सांगितले. पोलिसांनी संबंधित तरुणाला बोलावले. मी त्याला एवढेच सांगितले की, ज्या घरावर तू लघुशंका करत होता, त्या घरातील वहिनींची माफी माग. खरेतर, या संपूर्ण घटनेतून मला एकच गोष्ट जाणवली की, पुसदमध्ये वाढत्या गुन्हेगारीकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे”, असे अंकुरने आपल्या फेसबुक लाइव्ह व्हिडीओमध्ये म्हटले आहे. सोशल मीडियावर चाहत्यांकडून चिंता व्यक्त अंकुरची पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली असून, त्याचे चाहते आणि नेटकऱ्यांनी त्याच्या प्रकृतीविषयी विचारपूस केली आहे. एका लोकप्रिय कलाकारावर अशा प्रकारे टोळीने हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याने पुसद परिसरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed