दरवाढीचा निषेध:इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक; पंपावर आंदोलन, ‘मेलाेडी’च्या घोषणा देत सरकारवर टीका
![]()
पेट्रोल-डिझेल व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसने एल्गार पुकारत शुक्रवारी थेट पेट्रोल पंपावर आंदोलन केले. दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असून, महागाईने जनतेचे कंबरडे मोडले आहे, असे म्हणत काँग्रेसने दरवाढीचा निषेध केला. आंदोलन वाजीफदार पेट्रोल पंपासमोर करण्यात आले. केंद्र सरकारच्या नाकर्तेपणा आणि चुकीच्या धोरणांमुळे पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती गगनाला भिडल्या आहेत, अशी टीका विरोधकांनी केली आहे. गरीब, सामान्य जनतेला इंधन, अन्नधान्य, तेल जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करणे अशक्य झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः जनतेला पेट्रोल-डिझेल, खाद्य तेल, खते बचतीचे आणि वर्क फ्रॉम होम, सोने चांदी खरेदी न करण्याचे आवाहन करतात, मात्र स्वतः ते आणि भाजप पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या रॅली आणि कार्यक्रम घेत उधळपट्टी करत आहेत. जनतेसाठी एक नियम आणि सत्ताधाऱ्यांसाठी वेगळा नियम असून ही दुटप्पी भूमिका असल्याची टिका विरोधकांनी केली. दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आदेशानुसार पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणांचा निषेध करण्यात आला. जनतेवरचा अन्याय सहन केला जाणार नाही असा इशारा देण्यात आला. आंदोलनात महानगराध्यक्ष महेंद्र गवई, जिल्हा ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष प्रकाश तायडे, नगरसेवक आजाद खान, नगरसेविका सुवर्णरेखा जाधव, मोईन मोंटू खान, मो. इरफान, विजय देशमुख, प्रशांत गावंडे, मोहम्मद एजाज, मोहम्मद वसीम, संदेश वानखडे, सुनील वानखडे, मोहम्मद जाकीर, इजहार उल्ला, ताबिदा अरबीना, उजमा खान, महंमद जफर, मिलिंद नकाशे, विनोद डोंगरे आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले. महागाई, पेट्रोल-डिझेल दरवाढ, वाढते घरगुती खर्च आणि सर्वसामान्यांच्या अडचणी याविरोधात काँग्रेस कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ‘जनतेचा पैसा परत द्या’,‘महागाई बंद करा’, “मेलोडी खावो सब भुल जाओ’, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. “मेलोडी खावो सब भूल जाओ’
