बारामती पोटनिवडणूक:सुनेत्रा पवारांच्या विजयासाठी भाजप करणार आवश्यक मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला ‘शब्द’, काँग्रेस लढण्यावर ठाम
![]()
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये संघर्ष तीव्र झाला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा केली. या वेळी भाजपने ‘मोठा भाऊ’ म्हणून खंबीरपणे पाठीशी उभे राहण्याचा आणि सुनेत्रा पवारांना निवडून आणण्यासाठी सर्व आवश्यक मदत करण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. दरम्यान, काँग्रेसने या जागेवर आपला उमेदवार उभा केल्याने आता बारामतीची लढत प्रतिष्ठेची झाली आहे. अर्ज दाखल केल्यानंतर सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. काँग्रेस बॅकफूटवर नाहीच! काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या निवडणुकीत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, “बारामतीची जागा लढवण्यावर काँग्रेस अद्यापही ठाम आहे. ही निवडणूक लोकशाहीच्या मार्गाने लढली जाईल आणि आमचा कार्यकर्ता मैदानात उतरण्यासाठी सज्ज आहे.’
