OnePlus Nord 6 Launch | चार्जिंगचे टेन्शन विसरा! वनप्लसचा ९००० mAh बॅटरीचा नवा सुपरफोन लाँच; जाणून घ्या फीचर्स
OnePlus Nord 6 Launch | स्मार्टफोन बाजारात पुन्हा एकदा मोठी चर्चा निर्माण करत OnePlus Nord 6 हा नवीन स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आला आहे. या फोनची सर्वात मोठी खासियत म्हणजे तब्बल 9000mAh क्षमतेची बॅटरी. त्यामुळे वारंवार फोन चार्ज करण्याची गरज कमी होणार आहे. दमदार बॅटरी, शक्तिशाली प्रोसेसर आणि आकर्षक डिस्प्ले यामुळे हा फोन मिड-रेंज सेगमेंटमध्ये ग्राहकांसाठी आकर्षक पर्याय ठरू शकतो.
कंपनीच्या माहितीनुसार, मोठ्या बॅटरीमुळे हा फोन एकदा पूर्ण चार्ज केल्यावर साधारणपणे 2 ते 2.5 दिवस सहज चालू शकतो. तसेच 80W SUPERVOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट दिल्यामुळे फोन अतिशय वेगाने चार्ज होतो. फक्त 5 मिनिटे चार्ज केल्यावर जवळपास 1 तास गेमिंग किंवा सुमारे 2.5 तास व्हिडिओ स्ट्रीमिंग करता येते.
OnePlus Nord 6 मध्ये 6.78 इंचाचा 1.5K AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्क्रीनला 165Hz रिफ्रेश रेट आणि 3600 nits पीक ब्राइटनेस सपोर्ट आहे. त्यामुळे व्हिडिओ पाहताना किंवा गेमिंग करताना स्क्रीन अधिक स्पष्ट आणि स्मूथ अनुभव देते.
परफॉर्मन्ससाठी या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8s Gen 4 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये 12GB पर्यंत LPDDR5X RAM मिळते, त्यामुळे मल्टीटास्किंग आणि गेमिंग सहज करता येते. याशिवाय Android 16 आधारित OxygenOS 16 ऑपरेटिंग सिस्टीम या फोनमध्ये देण्यात आली आहे.
OnePlus Nord 6 Launch | कॅमेरा आणि इतर खास फीचर्स :
कॅमेराबाबत बोलायचे झाल्यास या फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये 50MP Sony LYT600 मुख्य कॅमेरा आणि 8MP अल्ट्रा-वाइड लेन्स देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 32MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.
याशिवाय या स्मार्टफोनमध्ये 27W रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. म्हणजेच या फोनच्या मदतीने इतर डिव्हाइसही चार्ज करता येतात. फोनमध्ये G2 Wi-Fi चिप, 3200Hz टच सॅम्पलिंग रेट, Infrared सेन्सर आणि 6 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स अशी अनेक प्रगत फीचर्स देण्यात आली आहेत.
किंमत आणि ऑफर :
OnePlus Nord 6 ची भारतातील सुरुवातीची किंमत 38,999 रुपये ठेवण्यात आली आहे. 8GB RAM आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी ही किंमत आहे. तर 12GB RAM आणि 256GB स्टोरेज असलेल्या टॉप व्हेरिएंटची किंमत 41,999 रुपये आहे.
लाँच ऑफर अंतर्गत Axis आणि HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डवर 4,000 रुपयांचा बँक डिस्काउंट मिळत आहे. त्यामुळे या फोनची प्रभावी किंमत 35,999 रुपयांपर्यंत कमी होते. या स्मार्टफोनची विक्री 9 एप्रिलपासून ऑनलाइन आणि रिटेल स्टोअर्समध्ये सुरू होणार आहे.
