तुम्ही कसले विश्वगुरू? तुम्ही तर डरपोक आहात!:इराणने अमेरिकेची भीती मोडून काढली, इराण-इस्रायल युद्धात पाकिस्तानला मिळणाऱ्या श्रेयावरून संजय राऊत आक्रमक
![]()
इराण-इस्रायल युद्धामध्ये दोन्ही देशांचे मोठे नुकसान झाले. यात ट्रम्प सारख्या झुंड राष्ट्रप्रमुखाला धडा शिकवण्यात आले. पण शेवटी युद्धात मध्यस्थी करण्याचे श्रेय पाकिस्तानला जात आहे. चीन तर मोठा देश आहे पण पाकिस्तानला श्रेय मिळाल्याने तो देश जगाच्या नकाशावर पु्न्हा एकदा आला आहे, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. हे श्रेय नरेंद्र मोदी आणि भारताला मिळायला हवे होते. महाविश्वगुरूंना हे श्रेय का मिळाले नाही तर त्यांची कोणतीच भूमिका नाही. जगात युद्ध सुरू असताना महाविश्वगुरू हे राजकीय विरोधकांवर प्रचार सभांमधून शाब्दिक बॉम्ब टाकत आहेत. संजय राऊत म्हणाले की, इराण-इस्रायल युद्ध हे संपूर्ण जगाचा विध्वंस होईल असे सुरू होते, यात हजारो लोक मारले गेले. अखाती राष्ट्रातील अनेक ठिकाणी शेकडो लोकं मारले गेले. पण इराणसारखा देश इस्रायल-अमेरिकेसारख्या महाशक्तीला शरण गेला नाही. 35 दिवसांपेक्षा जास्त काळ त्यांच्यासोबत युद्ध केले. अमेरिकेबद्दल जगाच्या मनात जी भीती होती ती भीती इराणने मोडून काढली. देशासाठी कसं लढावं हे इराणनं जगाला दाखवून दिले, राज्यकर्त्यांनी देशासाठी कसे बलिदान द्यावे, जनतेने कसे बलिदान द्यावे हे इराणने जगाला दाखवले आहे. ट्रम्प यांची भारताला चपराक संजय राऊत म्हणाले की, शांती बैठक इस्लामाबादमध्ये होणार आहे. जे इस्लामाबाद तुम्ही ऑपरेशन सिंदूरमध्ये ताब्यात घेणार होतात तिथे तुम्ही भाजपचा झेंडा फडकवणार होतात. तिथे ट्रम्प, नेत्यन्याहू आणि इराणचे राज्यकर्ते एकत्र येत शांततेवर चर्चा करणार आहेत.भारतासाठी ही लाजीरवाणी गोष्ट आहे. तुम्ही कसले विश्वगुरू आहात? तुम्ही भंपक आणि डरपोक आहात. ही ट्रम्प यांनी भारताला मारलेली चपराक आहे. कारण ते चीन आणि पाकिस्तानला थॅक्यू म्हणत आहेत. मोदींना आता सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. जयशंकर यांनी राजीनामा दिला पाहिजे संजय राऊत म्हणाले की, मोदींमुळे भारताची अवस्था ही डरपोक उंदरासारखी झाली आहे.इतक्या मोठ्या घडामोडी आशिया खंडात घडत असताना मोदींनी काय केले तर टेलिफोन ऑपरेटरचे काम केले. केवळ लोकांशी फोनवर बोलण्याचे काम त्यांनी केले. पाकिस्तानला श्रेय दिले यावर तरी बोलले पाहिजे. जयशंकर यांनी राजीनामा दिला पाहिजे. तुम्ही आपल्या शत्रूला कमी लेखत आहात. अजित पवार हे काँग्रेसचे प्रोडक्शन संजय राऊत म्हणाले की, जनभावना काय हे देवेंद्र फडणवीसांनी सांगावे. पंढरपूर, नांदेडमध्ये जनभावना नव्हती का? तेव्हा भाजपने ती जनभावना पायी तुडवली याचे उदाहरण देऊ शकतो. पार्थ पवार यांनी काँग्रेसवर टीका केल्यावर त्यांच्यावर टीका होणारच.अजित पवार हे काँग्रेसचे प्रोडक्शन आहे. शरद पवारांची संपूर्ण हयात काँग्रेसमध्ये गेली. काँग्रेस पक्षाचे देशासाठी मोठे योगदान. महात्मा गांधी, इंदिरा गांधी यांना जगभरात प्रतिष्ठा आहे. काँग्रेसचा पराभव झाला तर लोकशाही मरत नाही. काँग्रेसला 25 मते पडतील तुम्हाला 25 लाख मते पडतील. पण विरोध झाला पाहिजे.
