वाहतूक वळवली:समृद्धीवर टँकरमधून अमोनियम नायट्रेटची गळती; 5 तास कोंडी, मुंबईकडे जाणारी वाहने सिंदखेडराजात उतरवून जालन्यात पुन्हा महामार्गावर
![]()
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धीमहामार्गावर गुंडेवाडी शिवारात सोमवारी सायंकाळी ६.४५ वाजता गॅस टँकरमधून अमोनियम नायट्रेटची गळती झाली. रात्रभरगॅस गळती सुरूच राहिल्याने मंगळवारीसकाळी समृद्धी महामार्गावरील वाहतूक वळविण्यात आली. यामुळे या
.
मुंबईकडून नागपूरकडे जाणाऱ्याटँकरमधून (जीजे १२ बीवाय ८४००)सोमवारी सायंकाळी ६.४५ च्या सुमारास एका रसायनाची गळती सुरू असल्याचे लक्षातआले. मंगळवारी सकाळी वाहतूक वळवली. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
टँकर रस्त्याखाली, वाहतूक सुरळीत
जड वाहने वगळता इतर सर्ववाहने पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. जड वाहने खाली उतरू शकत नसल्यानेसमृद्धीवरच होती. आता टँकर रस्त्याच्या खाली उतरवण्यात आला असून सध्यावाहतूक सुरळीत सुरू आहे. -रुपाली दरेकर, पोलिस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक
गळती न थांबल्याने वाहने वळवली
टँकरमधील अमोनियम नायट्रेट उष्णतेमुळे गरमहोऊन द्रव पदार्थ बाहेर पडत होता. तेव्हा समृद्धीमहामार्ग येथील अग्निशामक दलाने थंड पाण्याचाफवारा मारून टँकरची उष्णता कमी करण्यासाठीप्रयत्न केले. कंपनीच्या मुंबई येथीलव्यवस्थापकांशी संपर्क केला. तेव्हा त्यांनी रात्रीचेवातावरण थंड झाल्यावर थंडावा निर्माण होईल,असे सांगितले. परंतु सोमवारी रात्रभर गळती नथांबल्याने मंगळवारी वाहतूक वळवली.
वाहतुकीचा मार्ग असा होता
नागपूरकडून मुंबईकडे जाणारी वाहनेसिंदखेड राजा येथून खाली उतरवण्यातआली. जालना येथून पुन्हा समृद्धीमहामार्गावर घेण्यात आली. मुंबईकडूननागपूरकडे जाणारी वाहने जालना येथूनखाली घेऊन सिंदखेड राजामार्गे पुन्हासमृद्धी महामार्गावर सोडण्यात आली.काही काळ एका लेनवरूनच वाहतूकसुरू ठेवण्यात आली होती. मंगळवारीसकाळी १०.३० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंतवाहतूक प्रभावित झाली होती.
सुरक्षा अधिकारी, बंब तैनात होते
मंगळवारी सायंकाळीही टँकरमधून गॅस गळती होतहोती, परंतु टँकर रस्त्याच्या खाली उतरवण्यातआल्याने वाहतुकीला कोणताही धोका नव्हता.घटनास्थळावर अनुचित प्रकार घडू नये म्हणूनअग्निशामक दल व सुरक्षा अधिकारी तैनात होते.
अमोनियम नायट्रेट ज्वलनशीलनाही, संपर्काने मळमळ, डोकेदुखी
अमोनियम नायट्रेट हे एक रासायनिक संयुगआहे. ते पाण्यात अतिशय सहज विरघळते.उष्णतेच्या प्रभावाने विघटन होण्याचीशक्यता असते. हे स्वतः ज्वलनशील नसलेतरी इतर पदार्थांना जळण्यास मदत करते.याच्या संपर्कात आल्यास खसा खवखवणे,मळमळ, उलटी, डोकेदुखी असा त्रास होतो.तसेच रक्तदाबही कमी होऊ शकतो.
