मंगरूळ फाट्यावर बूच पांगारा फुलला:8 प्रजातीच्या पक्ष्यांना पुरवतो मकरंद, या फुलांच्या पाकळ्या किर पोपट, रान चिमणी खातात
.

मंगरूळ फाट्यावर बूच पांगारा फुलला आहे. लाल-भगव्या मखमली फुलांनी झाड सजले आहे. पळस आणि पांगारा भावकीची झाडे आहेत. आधी पळस लाल भडक रंगात फुलतो. या फुलांना सुगंध नाही. निसर्गाने ही उणीव रंगात, मकरंदात भरून काढली आहे.
हा बूच पांगारा सुमारे २८ प्रजातींच्या पक्ष्यांना मकरंद पुरवतो. शिंजीर, जांभळा शिंजीर, शृंगराज, राखी वटवट्या, रानभाई, रान चिमणी, तांबट, कवड्या सुतार, पळस मैना, कुंटुक, लालबुड्या बुलबुल, शिपाई बुलबुल, हळद्या, जंगली मैना, भांग पाडी मैना, किर पोपट यांचा यात समावेश आहे. किर पोपट, रान चिमणी या फुलांच्या पाकळ्या आवडीने खातात. गाय कावळा, कुंटुक, काळटोप कस्तूर, कवड्या सुतार हे पक्षी काटेरी फांद्या घरटी बांधण्यासाठी वापरतात. मंगरूळ फाट्यावर लालभडक रंगात फुललेला बूच पांगारा.
झुडुपवर्गीय झाड देते शीतल सावली पूर्वी बारी समाजबांधव पांगाऱ्याची दुसरी प्रजाती असलेल्या पांगाऱ्याची पानं मळ्यात लावगड करत. पानवेल त्यावर चढवली जात असे. हे झुडुपवर्गीय झाड थंड, शीतल सावली देते. चैत्राच्या उन्हात हा वृक्ष पाखरं, फुलपाखरं, मधमाशा यांना मध, मकरंद पुरवतो. वसंताच्या, चैताच्या अखेरीला सकाळी सकाळी उगवता सूर्य काटेरी फांद्यांत अडकला आहे असे भासते.
