Housefull crowd in Zilla Parishad schools, new record of 785 admissions!, First class from April 1 instead of June; Newcomers welcomed with enthusiasm
![]()
इंग्रजी माध्यमाच्या झगमगाटाकडे वळलेली पालकांची पावले आता पुन्हा मायबोली मराठी आणि जिल्हा परिषद शाळांकडे वळू लागली आहेत. श्रीरामपूर तालुक्यात शिक्षण विभागाने घेतलेल्या विशेष पुढाकारामुळे यंदा १ एप्रिल रोजीच इयत्ता पहिलीमध्ये ७८५ विद्यार्थ्यांनी आपला प
.
तालुक्यातील शिक्षण विभागाने १ एप्रिलपूर्वीच नियोजनबद्ध सर्वेक्षण केले होते. गटशिक्षणाधिकारी संजीवन दिवे, विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी घरोघरी जाऊन पालकांचे प्रबोधन केले.तालुक्यात इयत्ता पहिलीमध्ये पात्र विद्यार्थ्यांचा शोध घेतला. या सर्वेक्षणातून तालुक्यात एकूण १ हजार ४३२ विद्यार्थी पहिलीमध्ये प्रवेशासाठी पात्र असल्याचे समोर आले. पालकांच्या भेटी घेऊन मराठी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेण्याबाबत प्रबोधन करण्यात आले. ग्रामीण भागात ६८३, तर नगरपालिका क्षेत्रात १०२ अशा एकूण ७८५ विद्यार्थ्यांनी पहिल्याच दिवशी प्रवेश घेतला. निमगाव खैरी (११२), टाकळीभान (१०७) आणि पढेगाव (१०२) या केंद्रांनी प्रवेशात बाजी मारली आहे. “शिक्षक आणि पालकांच्या समन्वयामुळे मराठी शाळांचे अस्तित्व पुन्हा उजळले आहे. १ एप्रिलपासून वर्ग सुरू करण्याचा हा उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक ठरू शकतो, असे गटशिक्षणाधिकारी संजीवन दिवे, यांनी सांगितले.
पालकांची बदलती मानसिकता
कोरोना काळानंतर मराठी शाळांकडे पालकांचा कल लक्षणीय वाढला आहे. केवळ पाचवी किंवा आठवीतच नव्हे, तर आता पहिलीपासूनच पालक मराठी माध्यमाला पसंती देत आहेत. विशेषतः मुलांच्या शिक्षणासाठी पालक पुन्हा जिल्हा परिषद शाळांवर विश्वास दाखवत असल्याचे चित्र आहे.
स्वागत आणि नवा उत्साह १५ जूनची वाट न पाहता १ एप्रिललाच शाळा सुरू करण्याचा हा प्रयोग राज्यात कौतुकाचा विषय ठरत आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी नवागतांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. कुठे ढोल-ताशांच्या गजरात, तर कुठे शैक्षणिक साहित्य आणि खाऊ देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. आपले असे जंगी स्वागत पाहून चिमुरडेही भारावून गेले होते.
