KKR Viral Video | शाहरुख खान संतापला? KKR च्या ड्रेसिंग रुममधील ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पाहा व्हायरल व्हिडिओ

0
KKR.webp.webp


KKR Viral Video | कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर पंजाब किंग्सविरुद्ध झालेल्या सामन्यादरम्यान एक वेगळाच प्रसंग घडल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. सामना सुरू झाल्यानंतर अवघ्या काही षटकांत पावसाने हजेरी लावल्यामुळे खेळ थांबवावा लागला. याचदरम्यान कोलकाता नाईट रायडर्सच्या ड्रेसिंग रुममधील एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये बॉलिवूड अभिनेता आणि संघाचा सहमालक शाहरुख खान नाराज अवस्थेत दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे.

पावसामुळे सामना थांबलेला असताना शाहरुख खान ड्रेसिंग रुममध्ये जाऊन खेळाडूंशी संवाद साधताना दिसतो. या वेळी तो संघाचे सीईओ वेंकी मैसूर यांच्यासोबत काहीतरी गंभीर चर्चा करताना व्हिडिओमध्ये दिसत असल्याने सोशल मीडियावर विविध चर्चा रंगल्या आहेत. काहींनी तर शाहरुखने संघाच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करत खेळाडूंची “शाळा घेतली” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (KKR Dressing Room Viral Video)

व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे. काही नेटकऱ्यांच्या मते, आयपीएल 2026 मध्ये केकेआरची सुरुवात निराशाजनक झाल्यामुळे शाहरुख नाराज दिसत होता. आतापर्यंत संघाला पहिल्या दोन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. (Shah Rukh Khan KKR Video)

या पार्श्वभूमीवर तिसऱ्या सामन्यातही सुरुवात चांगली न झाल्याने शाहरुखने संघाच्या व्यवस्थापनाशी गंभीर चर्चा केल्याचे काहींना वाटत आहे. तर काही चाहत्यांनी विनोदी प्रतिक्रिया देत “शाहरुख मैदानावर आला की संघाचा नशिब बदलतो” असेही म्हटले आहे.

KKR Viral Video | पावसामुळे सामना रद्द :

ईडन गार्डन्सवर झालेल्या या सामन्यात केकेआरने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र हा निर्णय फारसा यशस्वी ठरला नाही. फिन अॅलन आणि कॅमेरून ग्रीन हे दोघेही लवकर बाद झाले आणि संघाची अवस्था 25 धावांवर 2 बाद अशी झाली. (KKR Viral Video)

दरम्यान 3.4 षटकांचा खेळ झाल्यानंतर पावसामुळे सामना थांबवावा लागला. शेवटी हवामान सुधारले नाही आणि सामना रद्द करण्यात आला. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला. या सामन्यात संघाचा स्टार गोलंदाज हर्षित राणा देखील प्रेक्षकांमध्ये उपस्थित होता. सध्या केकेआरला आयपीएल 2026 मधील पहिल्या विजयाची प्रतीक्षा करावी लागत असून संघाच्या पुढील कामगिरीकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

News Title: KKR Dressing Room Viral Video: Shah Rukh Khan Seen Talking Seriously With Team After Match Stoppage



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed