पदासाठी ना तिकिटासाठी, विकासकामे व्हावीत म्हणून, शिंदेसेनेत जाण्याचा निर्धार:पंढरपूरच्या विचार विनिमय बैठकीत भालके यांची कार्यकर्त्यांना साद, हात उंचावून संमती‎

0
250_177556580869d4fbf04fb54_10244506838.jpg



इथून पुढे ३ वर्षे कोणत्याही निवडणुका नाहीत, त्यामुळे उमेदवारीसाठी नाही, मला कोणतेही पद नको त्यामुळे पद मिळावे म्हणूनही नाही, तर पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील विकास कामे व्हावीत, कार्यकर्त्यांची स्थानिक लोकप्रतिनिधींकडून होणारी अडवणूक थांबावी यासाठ

.

यानुसार येत्या दि. १२ एप्रिल रोजी भगीरथ भालके यांचा आपल्या समर्थकांसह शिवसेना प्रवेश निश्चित झाला आहे. दरम्यान, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल सावंत यांनीही शिवसेना प्रवेशाचे सूतोवाच केल्याने या दोन्ही नेत्यांचा सेना प्रवेश निश्चित झाला आहे. भगीरथ भालके गटाने काँग्रेस पक्षाला हात दाखवून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

यासंदर्भात कार्यकर्त्यांशी विचार विनिमय करून निर्णय घेण्यासाठी भालके यांनी पंढरपूर येथे कार्यकर्त्याची बैठक बोलावली होती. यावेळी भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत, शिवसेना नेते साईनाथ अभंगराव यांच्यासह मोठ्या संख्येने विविध गावचे सरपंच, आजी, माजी पदाधिकारी, शहर आणि तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.

गेल्या २ वर्षात स्थानिक लोक प्रतिनिधींनी आपल्या ग्रामपंचायतींचा निधी अडवला आहे, त्या गावातील विकास कामे ठप्प केली आहेत, पोलीस ठाण्याच्या माध्यमातून आपल्या कार्यकर्त्यांना त्रास दिला जातो.

नगराध्यक्षपदासोबत ११ नगरसेवक दिले ^४ महिन्यापूर्वी झालेल्या नगरपालिका निवडणुकीत पंढरपूरच्या नागरिकांनी आपल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीवर विश्वास टाकून नगराध्यक्षपदासोबत ११ नगरसेवक निवडून दिले. मात्र विकास कामे करण्यासाठी, निधी उपलब्ध करून घेण्यासाठी सत्तेसोबत जाण्याची गरज निर्माण झालेली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत येण्याचे आवाहन केले आहे, तसेच लागेल तर मदत करणे, सर्व ताकद पाठीशी उभा करू असा शब्द देतानाच त्यांच्याकडील नगरविकास खात्यामधून विकास कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिलेले आहे. भगीरथ भालके, माजी अध्यक्ष

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed