बेकायदेशीर पुतळे निर्मिती; आवारेचा चुर्मापुरी गावातील कारखाना सील:कृषी अवजारे केंद्राच्या नावाने सुरू होता उद्योग; व्यवस्थापक, सल्लागार ताब्यात
![]()
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील चुर्मापुरी येथे कृषी अवजारे केंद्राच्या नावाखाली सुरू असलेल्या महापुरुषांच्याअवैध पुतळे निर्मिती कारखान्याचा पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणीमुख्य सूत्रधार बाळराजे आवारे याला अटक करण्यात आली असून,त्या
.
संभाजी आघाव (२६ रा. महाकाळा) व ॲड. पंडीत उर्फ प्रणित डिकळे(वय ३०,रा.तांदुळवाडी, परांडा) यांना ताब्यातघेतले. महाकाळा येथील बाळराजे रामरावआवारे पाटील (वय ३७) याने २०२३ मध्येचुर्मापुरी येथे कृषी अवजारे सेवा केंद्र सुरू केले होते. मात्र, डिसेंबर २०२५ पासूनया केंद्रात शेती अवजारांऐवजी मुंबईतून फायबर मागवून या ठिकाणी महापुरुषांचे पुतळे तयार केले जात होते.तसेच काही पुतळे छत्रपती संभाजीनगरयेथील चिकलठाण्यातील एकाकारखान्यातूनही मागविले जात. आवारेयाचा हा कारखाना बंद करण्याचेआदेश उपविभागीय अधिकारी उमाकांतपारधी यांनी अंबडच्या तहसीलदारांनादिले आहेत. एका पुतळ्याला ७० किलोफायबर लागत होते. कमी किमतीततयार होणारा पुतळा जास्त रकमेतविकला जात होता.
उत्तर प्रदेशातील कामगार
या कारखान्याचे व्यवस्थापन पाहण्यासाठी आवारे याने संभाजी शिवाजी आघाव याची नियुक्ती केली होती, तर कायदेशीर बाबी हाताळण्यासाठी ॲड. पंडित उर्फ प्रणित डिकळे हा वकील म्हणून कार्यरत होता. विशेष म्हणजे, पुतळे घडवण्यासाठी उत्तर प्रदेशातील १६ कामगारांची फौजया ठिकाणी तैनात होती. कारखान्यातून आतापर्यंत विविध जिल्ह्यात ५७०महापुरुषांचे पुतळे उभारल्याचे एका चित्रफितीत आवारे याने सांगितले आहे.
फायबरपासून पुतळे तयार करण्याचाकारखाना थाटला होता. याने याव्यवसायाचे मोठे जाळे विणले होते.महापुरुषांचा पुतळा एकदा बसवलाकी तो सहजासहजी काढला जातनाही, या भावनेचा फायदा घेत त्यानेअनधिकृतपणे पुतळे बसवण्याचासपाटा लावला होता. प्रशासनानेयापूर्वीच या केंद्रावर बंदी घातली होती.बीएनएसएस कलम १६३ अन्वयेपुतळ्यांची निर्मिती, साठवणूक आणिवाहतुकीवर ६० दिवसांसाठी बंदीघालण्यात आली आहे. आदेशाचेउल्लंघन केल्यास कठोर फौजदारीकारवाई केली जाणार आहे.कारखानाहटवण्यासंदर्भात आदेश आले आहेत,परंतु उपविभागीय अधिकारी वतहसीलदार यांच्या आदेशानुसार हीकारवाई होणार आहे. सध्या याबाबतसांगता येणार नाही, अशी माहितीगोंदी पोलिसांनी दिली.
