‘दिव्य मराठी’ एक्सक्लुझिव्ह:शिक्षक भरती घोटाळ्याला लागणार ब्रेक; ई-ऑफिस प्रणालीसह ‘ओटीपी’ची सक्ती, पासवर्ड, युजर आयडी इतरांच्या हाती लागल्यानेच तयार बनावट आयडी
![]()
बोगस शालार्थ आयडी तयार करून झालेल्या राज्यव्यापी शिक्षक भरती घोटाळ्याची शिक्षण विभागाने गंभीर दखल घेतली आहे. यापूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पासवर्ड आणि युजर आयडी इतरांच्या हाती लागल्याने हा मोठा गैरप्रकार उघडकीस आला होता. यापुढे अशा घोटाळ्यांची पुनरावृ
.
विश्वासाचा गैरफायदा; बनावट सह्यांचा सुळसुळाट यापूर्वी कामाच्या व्यस्ततेमुळे वरिष्ठ अधिकारी विश्वासाने आपले पासवर्ड आणि युजर आयडी संबंधित लिपिकांकडे देत असत. मात्र, या विश्वासाचा गैरफायदा घेत हे पासवर्ड हस्ते-परहस्ते अनेकांपर्यंत पोहोचले. परिणामी, त्यातून शिक्षक नियुक्तीचे अनेक बोगस शालार्थ आयडी तयार झाले. धक्कादायक बाब म्हणजे, शिक्षणाधिकाऱ्यांच्या बनावट सह्या करून नियुक्तीच्या प्रस्तावांना परस्पर मान्यता देण्यात आली.
४२४ नियुक्त्या ठरल्या अवैध; २० जणांना बेड्या : आतापर्यंत तपासणी पूर्ण झालेल्या ४३१ पैकी तब्बल ४२४ नियुक्त्या अवैध ठरल्या आहेत. कागदपत्रे अचूक असल्याने केवळ ७ शिक्षकांचे पगार सुरू करण्यात आले आहेत. इतर १०२ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सुनावणी पूर्ण होऊन निर्णय येणे बाकी आहे, तर उर्वरित कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे.
अशी होते संपूर्ण प्रक्रिया
- संबंधित संस्थाचालक शिक्षणाधिकाऱ्याला रिक्त पदे वा पद भरण्याची परवानगी मागतो.
- परवानगी मिळाल्यावर रीतसर जाहिरात काढली जाते. त्यानंतर मुलाखती, पात्रता तपासणी व गुणदान तक्ता तयार होतो.
- संबंधित संस्थाचालक नियुक्ती आदेश काढण्यापूर्वी रिक्त पदे भरण्याची विहित प्रक्रिया पूर्ण केल्याचा ठराव घेतो.
- त्यानंतर संस्थेचे सदस्य सचिव किंवा मुख्याध्यापकाच्या स्वाक्षरीने नियुक्ती आदेश निघतो. त्यात कमीत कमी ७ दिवसात रुजू होण्याची मुदत दिली जाते.
- यानंतर नियुक्ती प्रस्ताव मान्यतेसाठी शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे जातो. शिक्षणाधिकारी प्रस्ताव तपासून संस्थेकडे परत पाठवतो.
- वैयक्तिक मान्यता मिळाल्यानंतर शाळा मुख्याध्यापक संबंधित शिक्षक वा शिक्षकेतर कर्मचाऱ्याचे नाव शालार्थ प्रणालीत नाव समाविष्ट करण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्याकडे प्रस्ताव पाठवतो.
- शिक्षणाधिकारी शिक्षण उपसंचालक यांच्याकडे फेरतपासणी प्रस्ताव पाठवतो.
- शिक्षण उपसंचालकांच्या अध्यक्षतेखालील समिती शिफारस प्रस्तावाची तपासणी करते.
- नंतर हा प्रस्ताव शाळेकडे जातो. तिथे मुख्याध्यापक संबंधित शिक्षकाची पूर्ण माहिती भरतो. नंतर पे-यूनिटकडे जातो. वेतन अधीक्षक प्रस्ताव मंजूर करतो.
