शिक्षक नसल्याने सिल्लोड पंचायत समितीत भरली विद्यार्थ्यांची शाळा:चिंचखेडा जि.प. शाळेत सहा महिन्यांपासून एकच शिक्षक
![]()
सिल्लोड तालुक्यातील चिंचखेडा जि.प. शाळेत गेल्या सहा महिन्यांपासून एकच शिक्षक आहे. तेही कधी तरी येतात. कधी शाळेचे हुशार विद्यार्थी, तर कधी त्या शिक्षकांच्या कारचा चालक विद्यार्थ्यांना शिकवत असल्याने त्रस्त ग्रामस्थांनी सोमवारी दुपारी १ वाजता सिल्लोड पंचायत समिती कार्यालयात शाळा भरवली. यामुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. तालुक्यातील चिंचखेडा येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे. शिक्षक वारंवार गैरहजर राहत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अधिक धक्कादायक म्हणजे, शाळेत कार्यरत असलेल्या बदर या शिक्षकांच्या अनुपस्थितीत त्यांच्या वाहनाचा चालक विद्यार्थ्यांना शिकवत असल्याचा पाढा काही विद्यार्थ्यांनी गटशिक्षणाधिकारी यांच्यासमोर वाचला. शिक्षणाचा दर्जा पूर्णपणे खालावला आहे. या गंभीर प्रकाराबाबत शालेय ^चिंचखेडा शाळेतील प्रकाराबाबत शालेय समितीची तक्रार आली आहे. मात्र दोन्ही शिक्षकांचा अपघात झाल्याने हा प्रश्न निर्माण झाला आहे. चौकशी करून कार्यवाही करू. – गटशिक्षणाधिकारी रमेश ठाकूर, सिल्लोड ६ एप्रिल रोजी सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत एकही शिक्षक शाळेत उपस्थित नसल्याने विद्यार्थ्यांनाच शिक्षक बनून वर्ग चालवावा लागला. नियुक्त असलेले शिक्षक कधी येतात, तर कधी नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, असे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणपत वाणी यांनी सांगितले. व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणपत वाणी यांनी गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, गटशिक्षण अधिकारी रमेश ठाकूर यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. विद्यार्थ्यांनीच शिक्षक बनून वर्ग चालवला चौकशी करून कार्यवाही करणार
