LPG Cylinder | गॅस ग्राहकांनो सावधान! १ जुलै ‘या’ ग्राहकांना गॅस सिलिंडर मिळणार नाही
LPG Cylinder | एलपीजी सिलिंडरच्या उपलब्धतेवर परिणाम होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने गॅस कनेक्शन संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नव्या नियमांनुसार पाइपद्वारे नैसर्गिक वायू वापरणाऱ्या ग्राहकांना लवकरच एलपीजी सिलिंडरचा पुरवठा थांबवण्यात येणार आहे. त्यामुळे दुहेरी गॅस कनेक्शन असलेल्या हजारो ग्राहकांना मोठा बदल स्वीकारावा लागणार आहे. (LPG Gas Supply Rule)
पुरवठा विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार पीएनजी (PNG) आणि एलपीजी (LPG) दोन्ही कनेक्शन असलेल्या ग्राहकांवर कारवाई करण्यात येणार आहे. ग्रीन गॅस लिमिटेड (Green Gas Limited) कडून अशा ग्राहकांची यादी मागवण्यात आली असून पुढील काही महिन्यांत या सर्व कनेक्शनची तपासणी केली जाणार आहे. नव्या नियमांनुसार एकाच घरात दोन्ही प्रकारचे गॅस कनेक्शन ठेवण्यास परवानगी दिली जाणार नाही. (LPG Cylinder News)
जिल्हा पुरवठा अधिकारी आनंद कुमार (Anand Kumar) यांनी सांगितले की, सध्या पीएनजी वापरणाऱ्या सुमारे 70 हजार ग्राहकांना त्यांचे एलपीजी कनेक्शन परत करावे लागणार आहेत. 1 जुलैपासून या ग्राहकांच्या घरांपर्यंत एलपीजी सिलिंडरचा पुरवठा बंद केला जाईल. केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने (Ministry of Petroleum) या संदर्भात आदेश जारी केला असून त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यांत हा निर्णय टप्प्याटप्प्याने लागू केला जाणार आहे.
LPG Cylinder | पीएनजी कनेक्शन वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न :
ज्या परिसरांमध्ये आधीच पीएनजी पाइपलाइन उपलब्ध आहे, त्या भागातील नागरिकांना केवळ पीएनजी कनेक्शनचा वापर करावा लागणार आहे. घरापासून सुमारे 300 मीटरच्या अंतरात पाइपलाइन असल्यास ग्राहकांना एका आठवड्यात कनेक्शन उपलब्ध करून दिले जाईल. यासाठी अर्ज करताना सुमारे 6000 रुपयांची सुरक्षा ठेव भरावी लागेल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
पुरवठा विभागाने पुढील तीन महिन्यांत सुमारे 25 हजार नवीन पीएनजी कनेक्शन देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात पाच हजार कनेक्शन देण्याची योजना आहे. दरम्यान, एलपीजी पुरवठा सुरळीत असल्याचा सरकारचा दावा असला तरी काही भागात सिलिंडरच्या कमतरतेची तक्रार नागरिकांकडून होत आहे. व्यावसायिक सिलिंडरचा अधिकृत दर सुमारे 925 रुपये असताना तो काळ्या बाजारात 1800 ते 2000 रुपयांना विकला जात असल्याचेही सांगितले जात आहे. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे देशभरातील गॅस पुरवठ्यावर परिणाम झाल्याचेही मानले जात आहे.
