IPL 2026 | सस्पेन्स वाढला! ३ टीम्स, १ जागा; प्लेऑफच्या ‘चौथ्या’ तिकीटासाठी कोणामध्ये रंगणार थरार?

0
sayali-web-2026-05-13T172152.585.webp.webp


IPL 2026 | आयपीएल 2026 (IPL 2026) च्या साखळी फेरीचा शेवट अत्यंत रंगतदार टप्प्यावर पोहोचला असून प्लेऑफमधील चौथ्या स्थानासाठी आज मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. पहिल्या तीन संघांनी आधीच पुढील फेरीत स्थान निश्चित केले असताना आता शेवटच्या जागेसाठी पंजाब किंग्स, राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात थेट स्पर्धा रंगली आहे. रविवारी होणाऱ्या सामन्यांनंतर प्लेऑफमधील अंतिम संघ स्पष्ट होणार आहे.

शनिवारी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्स (PBKS) संघाने लखनौ सुपर जायंट्स (LSG) वर मोठा विजय मिळवत स्पर्धेतील आपली आशा कायम ठेवली. कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने केलेल्या नाबाद 101 धावांच्या खेळीमुळे पंजाबने 197 धावांचे लक्ष्य अवघ्या 18 षटकांत पार केले. या विजयानंतर पंजाबचे 14 सामन्यांत 15 गुण झाले असून संघ सध्या चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. दुसरीकडे लखनौचा संघ 8 गुणांसह तळात राहिला आहे. या निकालामुळे दिल्ली कॅपिटल्स (DC) चे प्लेऑफचे स्वप्न संपुष्टात आले.

आता पंजाबच्या पात्रतेसाठी इतर संघांच्या निकालांवर अवलंबून राहावे लागणार आहे. मुंबई इंडियन्स (MI) संघाने राजस्थान रॉयल्स (RR) ला पराभूत करणे पंजाबसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याचवेळी दिल्लीने कोलकाताला रोखणेही गरजेचे ठरणार आहे. जर कोलकाता जिंकला, तर तो विजय फार मोठ्या फरकाने नसावा, अन्यथा नेट रन-रेटमध्ये पंजाब मागे पडू शकतो. पंजाबचा सध्याचा नेट रन-रेट +0.309 इतका आहे.

IPL 2026 | केकेआरसाठी मोठ्या विजयाची गरज :

रियान पराग (Riyan Parag) यांच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्ससाठी समीकरण तुलनेने सोपे आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध विजय मिळवला तर राजस्थान थेट 16 गुणांसह प्लेऑफमध्ये प्रवेश करेल. मात्र पावसामुळे सामना रद्द झाल्यास राजस्थानला केवळ एक गुण मिळेल आणि नेट रन-रेट कमी असल्याने संघ स्पर्धेबाहेर जाऊ शकतो. राजस्थानचा सध्याचा नेट रन-रेट +0.083 असा आहे.

कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघासाठी परिस्थिती अधिक कठीण आहे. कोलकाताचे सध्या 13 गुण असून नेट रन-रेट +0.011 इतका आहे. त्यामुळे त्यांना प्रथम राजस्थानचा पराभव होण्याची अपेक्षा ठेवावी लागेल. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध मोठ्या फरकाने विजय मिळवणे आवश्यक आहे. कारण केवळ विजय पुरेसा ठरणार नाही, तर नेट रन-रेटमध्ये पंजाबला मागे टाकणेही गरजेचे आहे. त्यामुळे आजचे दोन्ही सामने आयपीएल 2026 मधील प्लेऑफचे चित्र पूर्णपणे बदलू शकतात.

News title : IPL 2026 Playoff Race

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed