ब्लास्टिंगचा दणका अन् सज्जनगड घाट ठप्प!:रुंदीकरणाच्या कामावर सुरक्षेचे प्रश्नचिन्ह; दरड कोसळल्याने शेकडो भाविक-पर्यटक अडकले

[ads1]


साताऱ्याच्या धार्मिक आणि पर्यटन नकाशावरील महत्त्वाचे ठिकाण असलेल्या सज्जनगडाकडे जाणाऱ्या घाटरस्त्यावर गुरुवारी सायंकाळी डोंगराचा मोठा कडा अचानक कोसळला. प्रचंड मोठ्या दरडीसह दगड-मातीचा ढिगारा मुख्य रस्त्यावर आल्याने सज्जनगड घाटातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. या घटनेमुळे गडावर दर्शनासाठी गेलेले भाविक, पर्यटक तसेच स्थानिक नागरिक मोठ्या अडचणीत सापडले. रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी सुरू असलेल्या ब्लास्टिंगच्या पद्धतीवर या घटनेनंतर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सुरक्षेच्या उपाययोजना न करता डोंगर फोडण्याचे काम सुरू असल्यामुळेच दरड कोसळल्याचा आरोप स्थानिक नागरिक व पर्यटकांनी केला आहे. त्यामुळे संबंधित कामाची तांत्रिक पाहणी करून ब्लास्टिंगसाठी आवश्यक सुरक्षा नियमांचे पालन झाले होते का, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे. दरड कोसळल्यानंतर घाटरस्त्यावर मोठमोठे दगड आणि मातीचा ढिगारा साचला. त्यामुळे सज्जनगडाकडे जाणारी तसेच गडावरून परतणारी वाहने मार्गातच अडकली. अचानक वाहतूक बंद झाल्याने भाविक आणि पर्यटकांची मोठी गैरसोय झाली. काही काळ या परिसरात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. जेसीबीसह अन्य यंत्रसामग्रीच्या मदतीने रस्त्यावरील दरड हटविण्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र, डोंगराच्या कड्यावर अजूनही धोकादायक स्थिती असल्यास सुरक्षिततेची खात्री करूनच वाहतूक सुरू करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. रुंदीकरण आवश्यक असले तरी त्यासाठी भाविकांच्या सुरक्षिततेशी तडजोड केली जाणार नाही ना? असा सवाल या घटनेनंतर उपस्थित झाला आहे. ब्लास्टिंगचे नियोजन, सुरक्षाव्यवस्था आणि कामाची तांत्रिक पद्धत याची प्रशासनाने तातडीने तपासणी करण्याची मागणी होत आहे.
दरड पूर्णपणे हटवून रस्ता सुरक्षित होईपर्यंत नागरिकांनी सज्जनगड घाटातून प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. हेही वाचा… वर्ध्यात 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचाराचा आरोप:सहा संशयित ताब्यात, रेल्वे पोलिसांकडून तपास सुरू नागपूर जिल्ह्यातील 19 वर्षीय तरुणीवर वर्धा रेल्वे स्थानक परिसरात सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती असून, या प्रकरणी रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी सहा संशयितांना ताब्यात घेतले आहे. पीडित तरुणीने चौकशीदरम्यान सहा जणांची ओळख पटवल्याची माहिती लोहमार्ग पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांनी दिली. प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सविस्तर वाचा…

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *