[ads1]
![]()
विरोधकांचे ठरलेलं असतं की, या संवैधानिक संस्थांवर काहीतरी आरोप करायचे आणि नॅरेटिव्ह सेट करायचे. आता हे आरोप म्हणजे शिळी भाकरी वाटू लागले आहेत, असे मंत्री चंद्रेशखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. तर इंडिया आघाडी स्थापन झाल्यापासून त्यांना केवळ निगेटिव्ह नॅरेटिव्ह सेट करायचे असते. राजस्थानच्या कोटामध्ये जाऊन काँग्रेसने विद्यार्थ्यांसोबत नाटक केले, पण तिथे त्यांचा पराभव झाला. राहुल गांधी म्हणजे पराभव आणि मोदीजी म्हणजे विजय, पराभव झाला की निवडणूक आयोग चुकीचा आहे असे म्हणतात. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, विजय वडेट्टीवार यांनी राजकीय बोलणं सोडले तर बरे होईल. खासगीमध्ये ते कबुल करतात की सरकारने योग्य उपाययोजना केल्या आहेत.पण राजकीय बोलावे लागते. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष या दोघांची जवाबदारी आहे की त्यांनी दुष्काळाच्या मुद्द्यावर काम केले पाहिजे. विरोधी पक्षाने दुष्काळाच्या मुद्द्यावर राजकारण करू नये. जे दिले आहे ते योग्य पद्धतीने देत आहोत. विरोधकांची जवाबदारी आहे की सरकारने दिलेले पॅकेज जनतेपर्यंत पोहचते का नाही ते. जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करणे योग्य नाही. सर्वांचे अचूक पंचनामे व्हावे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी परवाच सांगितले आहे की एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे जे अहवाल जायचे आहेत ते जातील पण राज्य सरकार त्याची वाट बघणार नाही राज्य सरकार त्याची वाट बघणार नाही आपल्या उपाययोजना करेल. एनडीआरएफच्या प्रस्तावासाठी निकष लावले जातात. पंचनामे अचूक झाले पाहिजे, कोणाचेही सुटू नये यासाठी प्रयत्न केले पाहिजे. दर मंगळवारी आढावा घेणार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची 11 सदस्यीय उपसमिती तयार केली आहे. दुष्काळाचा आढावा घेणं, परिस्थितीनुसार उपाययोजना करणे. शासनाच्या निर्णयाप्रमाणे लक्ष देणं. अचूक पंचनामे करण, पिण्याचे पाणी पुढील वर्ष दीड वर्ष कसे पुरेल यासह चाऱ्याचा प्रश्न उद्भवणार नाही याकडे लक्ष देण्यासाठी रेशन अन्नासाठी प्रयत्न करण्याचे काम करणार आहोत. दुष्काळाचे शासन निर्णय एक दोन दिवसांमध्ये होतील त्यावेळी या सर्व विषयाकडे लक्ष देण्याचे काम उपसमिती करणार आहे. राज्यात परिस्थिती वाईट आहे पण सरकार जनतेच्या पाठीशी उभे आहे, काही कमी पडू देणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी सूचित केले आहे. दर मंगळवारी आम्ही या समितीचा आढावा घेणार असून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम करणार आहोत. हे ही वृत्त वाचा
शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसणार नाही: मुंबईत बसून दुष्काळ जाहीर केल्याने न्याय मिळत नाही, सरकार योग्य निर्णय घेईल- रावसाहेब दानवे आमचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. प्रामुख्याने पिण्याचे पाणी, रोजगार, जनावरांसाठी चारा आणि शेतीचे झालेले नुकसान यासाठी सरकार योग्य निर्णय घेईल, असे भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे.विजय वडेट्टीवार यांचे सरकार असताना ते कधी शेतावर गेले नाहीत, ते आम्हाला ‘शेतावर जाऊ नका’ असा सल्ला देत आहेत; पण आम्हाला वाटते की शेतकऱ्यांच्या बांधावर गेले पाहिजे, त्यांच्या व्यथा समजून घेतल्या पाहिजेत आणि त्या मांडल्या पाहिजेत. मुंबईमध्ये बसून दुष्काळ जाहीर केला, तर शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही. रावसाहेब दानवे म्हणाले की, कल्याण काळे हे त्यांच्या लोकसभा मतदारसंघात किती दिवसांनी दुष्काळ पाहण्यासाठी आले? त्यांच्याकडे शेतकऱ्यांना देण्यासारखे काहीच नाही. सरकार शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणार नाही, आमचे सरकार शेतकऱ्यांना मदत करणार. शेतकऱ्यांचे समाधान आम्ही पूर्णपणे केले. सविस्तर वाचा
[ads2]
















Leave a Reply