बाप्पा निघाले गावाला!:पुण्यात गणेश विसर्जनाला निघण्यापूर्वी 'ही' बातमी नक्की वाचा! PMC चे मोठे नियोजन, 'या' क्रमांकांवर मिळेल तातडीची मदत

[ads1]


अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने शहरात गणेश विसर्जन सोहळा सुरळीत पार पाडण्यासाठी अत्यंत कडक व चोख तयारी केली आहे. विसर्जन मिरवणूक मार्ग, प्रमुख घाट, कृत्रिम हौद, स्वच्छता आणि वीज व्यवस्था या सर्व कामांची पाहणी करून प्रशासनाने तयारी अंतिम टप्प्यात आणली आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून महापालिकेने शहरात 277 ठिकाणी 4,130 फ्लडलाईट बसवले आहेत, तर 94 महत्त्वाच्या ठिकाणी 390 CCTV कॅमेऱ्यांची थेट नजर असणार आहे. घाटांवर रात्रीच्या वेळी पुरेशा प्रकाशाची सोय करण्यात आली असून वीजपुरवठा खंडित झाल्यास 24 तास जनरेटरची पर्यायी व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली आहे. याशिवाय रस्ते दुरुस्ती, सार्वजनिक स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी आणि निर्माल्य संकलनाचीही पूर्ण तयारी झाली आहे. महापालिका अग्निशमन दलाने अमृतेश्वर, ओंकारेश्वर, गरवारे कॉलेज, संगम घाट, विठ्ठल मंदिर, बाप्पू घाट, दत्तवाडी अशा 15 प्रमुख घाटांवर 22 अधिकारी, 15 फायरमन आणि 120 जीवरक्षक तैनात केले आहेत. या घाटांवर 24 तास सुरक्षा कवच असेल. सुरक्षेसाठी दोरखंड, लाईफ जॅकेट आणि लाईफ रिंग सज्ज ठेवल्या आहेत. अलका टॉकीज चौकासारख्या गर्दीच्या ठिकाणी आपत्कालीन स्थितीसाठी विशेष अग्निशमन वाहन आणि 3 जवान तैनात असतील. कोणत्याही आणीबाणीच्या प्रसंगी नागरिकांच्या मदतीसाठी महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग 24 तास कार्यरत राहील. आपत्कालीन परिस्थितीत खालील क्रमांकांवर त्वरित संपर्क साधता येईल: प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की त्यांनी नदीपात्रात खोल पाण्यात न जाता उपलब्ध कृत्रिम हौदांचा वापर करावा, तसेच वीज यंत्रणा व लाईट पोलशी छेडछाड न करता प्रशासनाला सहकार्य करावे.

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *