[ads1]
![]()
साळवे गार्डनसमोरील गोकुळ हॉटेलच्या किचनमध्ये गुरुवारी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास सिलिंडरमधून गॅस लीक झाल्याने अचानक आग लागली. या आगीत हॉटेलमधील पाच कर्मचारी जखमी झाले. सर्व जखमींना तातडीने नमो हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सिलिंडरमधून गॅस गळती झाल्यानंतर किचनमध्ये आग लागल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत आग नियंत्रणात आणली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या घटनेत आतिक खान (वय ३४) हा सुमारे ३० टक्के भाजला असून त्याच्या दोन्ही हात-पायांना भाजल्याच्या जखमा झाल्या आहेत. संजय कुमार चौरसिया (१९) याच्या चेहऱ्याला सुमारे १० टक्के भाजले आहे. शंकर सरदार (२६) याच्या हाताला व चेहऱ्याला किरकोळ भाजले असून तो सुमारे १० टक्के भाजला आहे. रंजीत रॉय (२२) याच्या उजव्या हाताला मनगटाजवळ फ्रॅक्चर झाले आहे. छाया लक्ष्मण कांबळे (५५) यांना किरकोळ दुखापत झाली आहे. सर्व जखमी हे हॉटेलमधील कर्मचारी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, सिलिंडरमधून गॅस गळती नेमकी कशामुळे झाली आणि आग लागण्यामागील कारण काय, याबाबत अधिक चौकशी सुरू आहे. याबाबत अग्निशामक दलाने सांगितले की, गुरवारी सायंकाळी सात वाजता कोंढवा बुद्रुक, हॉटेल गोकुळ येथील सिलेंडरने मोठ्या प्रमाणात पेट घेतला होता. अग्निशमन दलाची दोन वाहने दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवत धोका दूर केला असून दलाची मदत पोहोचण्यापूर्वी जखमींना स्थानिकांनी रुग्णालयात नेले अशी प्राथमिक माहिती आहे.
[ads2]
गोकुळ हॉटेलच्या किचनमध्ये सिलिंडर लीक होऊन आग:पाच कर्मचारी जखमी, नमो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू; जीवितहानी नाही
















Leave a Reply