मध्यरात्री रेती वाहतुकीवर महसूल विभागाची धडक:खापरखेड्याजवळ दोन टिप्पर व ट्रॅक्टर ताब्यात; एसडीओ सिद्धार्थ शुक्ला यांच्या नेतृत्वाखाली कारवाई

[ads1]


धारणी तालुक्यात सुरू असलेल्या अवैध रेती वाहतुकीवर महसूल विभागाने मध्यरात्री कारवाई केली. उपविभागीय अधिकारी (एसडीओ) सिद्धार्थ शुक्ला यांच्या नेतृत्वाखाली रात्री सुमारे २ वाजता खापरखेडा परिसरात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत दोन टिप्पर आणि एक ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आले. धारणी तालुक्यात अवैधरीत्या रेती वाहतूक होत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानंतर एसडीओ सिद्धार्थ शुक्ला यांनी महसूल पथकासह खापरखेडा परिसरात पाहणी केली. यावेळी संशयास्पदरीत्या रेती वाहतूक करणारी वाहने आढळून आल्यानंतर ती थांबवून ताब्यात घेण्यात आली. या कारवाईत एमएच २७ बीएक्स ९४४८, एमएच ४९ एपी १८३३ क्रमांकाचे दोन टिप्पर तसेच एमएच २७ बीझेड १०८३ क्रमांकाचा ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आला. तिन्ही वाहनांचा पंचनामा करण्यात आला असून, पुढील प्रशासकीय कारवाई सुरू आहे. या कारवाईदरम्यान मंडळ अधिकारी मनीष रोकडे, तलाठी रवी भिलावेकर, तलाठी जितेंद्र कास्देकर, तलाठी प्रवीण मावस्कर तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते. रेतीची अवैध वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभागाकडून रात्रीच्या वेळीही तपासणी आणि कारवाई केली जात असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. खापरखेडा परिसरातील मध्यरात्रीच्या या कारवाईमुळे अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *